सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ६२५७ नवे रुग्ण तर ९० जणांचा मृत्यू

मागील २४ तासात शहरात ३७३६ कोरोनाचे नवे रुग्ण ,३७४० जण कोरोना मुक्त : ५८२२ कोरोनाचे संशयित तर ५६७७ अहवाल येणे प्रतिक्षेत 

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ९० जणांचा मृत्यू झाला ही अतिशय चिंतेची बाब आहे. आज ग्रामीण भागात ४६ जणांचे मृत्यू झाले आहे. तर नाशिक शहरात ४१ आणि ३ जण बाहेरगावचे,आज जिल्ह्यात कोरोनाचे ६२५७ तर शहरात ३७३६ असे नवीन रुग्ण आढळले आहे.आज जवळपास ५८२२ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून ३८६१ कोरोना मुक्त झाले आहेत. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३७३६ तर ग्रामीण भागात २३१० मालेगाव मनपा विभागात १३१ तर बाह्य ८० अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.०५ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.०१ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ४४६६९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २५८६५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ५६७७ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ९० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.   अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८१.२२ %,नाशिक शहरात ८४.०१%, मालेगाव मध्ये ८०.३५% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९३.६७ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.०५ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ९०

नाशिक महानगरपालिका-४१

मालेगाव महानगरपालिका-०१

नाशिक ग्रामीण-४६

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३१२२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १४२८

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०७

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५४२२

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३७

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२८९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ५६७७

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)