
Nashik : जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ आज ३५३२ नवे रुग्ण ;२३ जणांचा मृत्यू

शहरात २०९६ नवे रुग्ण तर दिवसभरात २६४१ कोरोना मुक्त
नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात कोरोनाचे ३ हजार ५३२ नवे रुग्ण आढळले असून शहरातील रुग्णसंख्येत २०९६ ने वाढ झाली आहे.आज कोरोनामुळे जिल्ह्यात एकूण २३ जणांचा मृत्यू झाला आहे.यापैकी शहरात १० जणांचा समावेश आहे.गेल्या काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढते आहे ही चिंतेची बाब आहे.
आज दिवसभरात २६४१ रुग्ण कोरोना मुक्त झाले.कालच्या पेक्षा आज कोरोनामुक्त होण्याच्या प्रमाणात वाढ बघायला मिळाली ही समाधानाची बाब आहे.अद्याप ५ हजार ५८८ संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.
आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण-2641
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 3532
नाशिक मनपा- 2096
नाशिक ग्रामीण- 1269
मालेगाव मनपा- 0121
जिल्हा बाह्य- 0046
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2374
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -23
नाशिक मनपा- 10
मालेगाव मनपा- 04
नाशिक ग्रामीण- 09
जिल्हा बाह्य- 00
नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या
(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)
https://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-30-MAR-2021.pdf
