सर्वात वर

Corona Update : धोका टळला नाही !आज जिल्ह्यात ३१५ तर शहरात २०१ रुग्ण

Corona Update : नाशिक जिल्ह्यात आज ३६४ रुग्ण कोरोना मुक्त; ६ जणांचा मृत्यू 

नाशिक – नाशिक जिल्ह्यात आज ३१५ कोरोनाचे एकूण नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी नाशिक शहरात २०१ तर ग्रामीण भागात ११४ कोरोनाचे (Corona Update) नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ९१८ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३६४ जण कोरोना मुक्त झाले.

जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक जिल्ह्यात आज ६ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.५४ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.९४ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २८६५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १९०० जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात २०१ मालेगाव मध्ये १०,नाशिक ग्रामीण १०३ ,जिल्ह्या बाह्य ०१ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ९३५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – (Corona Update) नाशिक ग्रामीण मधे ९४.९७,टक्के, नाशिक शहरात ९५.९४ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.३२ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.८७  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.५४ % इतके आहे.

आज शहराची स्थिती – नाशिक शहरात आज २०१ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ६०५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ७०,२५४ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६७,४०४ जण कोरोना मुक्त झाले असून १९०० जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) फ्लॅट ३२/४४,निमी टेपंल, मेहेरधाम पेठरोड,नाशिक येथील ५४ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) फ्लॅट १६,गजानन पार्क,महालक्ष्मी नगर, आडगाव,नाशिक येथील ४२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०६
नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०३

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १९०४

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९५०

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १०

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ८३५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ९३५

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)