सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज ३०२५ कोरोना मुक्त तर ३००२ नवे रुग्ण

मागील २४ तासात शहरात १५८४ कोरोनाचे नवे रुग्ण : ३४८८ कोरोनाचे संशयित,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६० % तर ४० जणांचा मृत्यू 

नाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात कोरोनाचे ३०२५जण कोरोना मुक्त झाले आहे.तर जिल्ह्यात ३००२ नवे रुग्ण आढळले आहेत.काही दिवसापासून नाशिक जिल्ह्यात रुग्णांची संख्या कमी होत आहे हि दिलासादायक बाब आहे.   

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ८९.६० झाली आहे.आज शहरात कोरोनाचे १५८४ रुग्ण आढळले आहेत. आज जवळपास ३४८८ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ४० जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २६ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ११ ,मालेगाव महापालिका हद्दीत ३ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १५८४ तर ग्रामीण भागात १२२० मालेगाव मनपा विभागात ११५ तर बाह्य ८३ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.६० इतके झाले तर शहरात हा रेट ९१.८९ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३३१७५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १५३१५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ३७१४ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ४० जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ८६.३५ %,नाशिक शहरात ९१.८९ %, मालेगाव मध्ये ८४.२४ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९०.५५ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८९.६०%इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १५८४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण २५७३ क्षेत्र प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत २,०९,३६०रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,९२,३८५ जण कोरोना मुक्त झाले तर १५,३१५जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४०

नाशिक महानगरपालिका-११

मालेगाव महानगरपालिका-०३

नाशिक ग्रामीण-२६

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ३८६५

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १६६०

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १०

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३२०३

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२१५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ३७१४

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)