सर्वात वर

नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत वाढ

आज किती नवे रुग्ण आढळले जाणून घ्या 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे १३५४ नवे रुग्ण आढळले असून नाशिक शहरातील रुग्णांमध्ये ९४४ वाढ झाली आहे.महत्वाची बाब म्हणजे आज ८०२ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना मुळे ८ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्या मध्ये शहरात ५ आणि जिल्ह्यात ३ जणांचा मृत्यू झाला आहे. 

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात ९४४ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ७३२ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८९,२८४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८०,९८३ जण कोरोना मुक्त झाले तर ७२३० जण उपचार घेत आहेत. तर शहरात आज ५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.    

सायंकाळी आलेल्या अहवालात (Corona Update) आज नाशिक शहरात ९४४ तर ग्रामीण भागात २७९ मालेगाव मनपा विभागात ९६ तर बाह्य ३५अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १६३२ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ८०२ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.४९ इतके झाले तर शहरात हा रेट ९०.७० टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ९४११ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ७२३० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ४०३९ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली.   

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-16-MAR-2021.pdf