सर्वात वर

Nashik : आज जिल्ह्यात कोरोनाचे ३७१२ तर शहरात १९४२ नवे रुग्ण : ३३ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात कोरोनाचे ३६३१ संशयित तर ५९१० अहवाल येणे प्रतिक्षेत ; ३२९५कोरोना मुक्त

नाशिक – (Corona Update)आज जिल्ह्यात कोरोनाचे एकूण ३७१२ रुग्ण आढळले असून त्यापैकी नाशिक शहरात १९४२ नवे रुग्ण आढळले आहेत. कालच्या पेक्षा हा आकडा कमी जरी असला तरी अद्याप नाशिककरांची चिंता कमी झाली नाही. प्रशासन दिवस रात्र काम करत आहे.पण नागरीकांनी विनाकारण बाहेर नये नागरिकांनी स्वतः बरोबर इतरांची ही काळजी घेतली पाहिजे तर कोरोनाला खऱ्या अर्थाने रोखता येईल. 

आज रात्री ८ पासून सोमवारी सकाळी ७ पर्यंत नाशिक जिल्ह्यात कडक लॉक डाऊन आहे. पोलीस दल रस्त्यावर उतरले आहे. विनाकारण फिरणाऱ्या व्यक्तीवर कारवाई होणार आहे. नागरीकांनी स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे.शक्यतो बाहेर पडू नका आणि बाहेर जाणे गरजेचे असल्यास मास्क घाला ,नियमित हात धुवा,सुरक्षित अंतर पाळा असे आवाहन करण्यात आले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात  १९४२  तर ग्रामीण भागात १६६६ मालेगाव मनपा विभागात ५६ तर बाह्य ४८ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ३६३१ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३२९५ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८२.५० इतके झाले तर शहरात हा रेट ८३.६७ टक्के आहे.

सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३६२३५ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २१२०० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ५९१०अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Corona Update)  
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ८०.९५ %,नाशिक शहरात ८३.६७%, मालेगाव मध्ये ७६.२९% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८५.४६ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८२.५० %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १९४२ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२९३ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,३७,३९२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,१४,९६२ जण कोरोना मुक्त झाले तर २१,२०० जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३३ (Corona Update)

नाशिक महानगरपालिका-०५

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-२६

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २६२०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२३०

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ८:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३२१०

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ५६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –३००

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ५९१०

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/04/AGE-GENDER-TEMP-09-MAR-21.pdf