सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे १३७६ नवे रुग्ण तर ५५१ कोरोना मुक्त

(Corona Update) मागील २४ तासात शहरात ७८८ नवे रुग्ण ,१३०८ कोरोनाचे संशयित तर ६ जणाचा मृत्यू

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १३५६नव्या रुग्णात वाढ झाली आहे त्यापैकी नाशिक शहरात ७८८ ने रुग्ण वाढले आहेत  तर जिल्ह्यात एकूण ६ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात (Corona Update) आज नाशिक शहरात ७८८ तर ग्रामीण भागात ४०७ मालेगाव मनपा विभागात १४९ तर बाह्य ३२ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १३०८ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ५५१ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९१.८२ इतके झाले तर शहरात हा रेट ९१.१७ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ८८६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ६७३१ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २७९२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात ७८८ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६४४ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ८८,३४० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८०,५४३ जण कोरोना मुक्त झाले तर ६७३१ जण उपचार घेत आहेत. तर शहरात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.   

 नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-15-MAR-2021.pdf