सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरू : बरे होण्याची टक्केवारी ९६.०७ %

जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ६९ हजार ६५२  रुग्ण कोरोनामुक्त : उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ४९२ ने घट

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असली तरी मृत्यूदर अधिक आहे हे येणाऱ्या रोजच्या संख्येमुळे दिसते आहे.जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध लागू केल्या मुळे आज रुग्ण संख्या कमी होते आहे. आणि नाशिक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १० % पेक्षा कमी आल्याने आपण सुरक्षित झोन मध्ये आहोत.नियमित सुरक्षित झोन मध्ये राहण्यासाठी नागरीकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ६५२ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये १ हजार ४९२ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ६३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

(Corona Update) उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ७२३,  बागलाण ३६०, चांदवड ५०३, देवळा २३३, दिंडोरी ४७२, इगतपुरी ९७, कळवण ३२८, मालेगाव ३२२, नांदगाव २९८, निफाड ४४१, पेठ ४४, सिन्नर ६१२, सुरगाणा १३०, त्र्यंबकेश्वर ३६, येवला १०६ असे एकूण ४ हजार ७०५ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ४ हजार ७४१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ९९३ तर जिल्ह्याबाहेरील ५६ रुग्ण असून असे एकूण १० हजार ४९५ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ८४ हजार ७८४ रुग्ण आढळून आले आहेत.

(Corona Update)रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९५.१८ टक्के, नाशिक शहरात ९६.९८ टक्के, मालेगाव मध्ये  ८९.४४  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.०२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.०७ इतके आहे.

मृत्यु :
नाशिक ग्रामीण २ हजार २४८ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून १ हजार ९७९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३११ व जिल्हा बाहेरील ९९ अशा एकूण ४ हजार ६३७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 
(Corona Update) लक्षणीय :
◼️३ लाख  ८४  हजार ७८४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ६९ हजार ६५२ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  १०  हजार ४९५  पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.०७ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)