सर्वात वर

Nashik : आज कोरोनाचे जिल्ह्यात ४३३४ तर शहरात २४०१ नवे रुग्ण ; २२ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात ४३०६ कोरोनाचे संशयित ; ६१२३ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ३०९८ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्यात आज पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होतांना दिसत आहे. आज नाशिक शहरात कोरोनाचे २४०१ नव्या रुग्णांमध्येवाढ झाली आहे. तर नाशिक जिल्ह्यातील आजच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४३३४ झाली आहे.या नियमित वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्ये मुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २४०१ तर ग्रामीण भागात १७६८ मालेगाव मनपा विभागात ९१ तर बाह्य ७४ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ४३०६ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३०९८जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५. ५३ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.६३ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ६३७९ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २९४४५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६१२३ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात को रोनामुळे २२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक ग्रामीण मधे ८२.२७ %,नाशिक शहरात ८४.६३ %,मालेगाव मध्ये ७५.९८ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.०९ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८५.५३ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात २४०१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १३७८ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,२१,२४४ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी १,०२,६०६ जण कोरोना मुक्त झाले तर १७,४७२ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली. 

(Corona Update)  

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २२

नाशिक महानगरपालिका-०८

मालेगाव महानगरपालिका-०३

नाशिक ग्रामीण-१०

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २४४७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १०६१

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ९:००वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०५

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ४०५४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २२

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१८०

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ६१२३

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/04/AGE-SEX-TEMPLATE-3-APR-2021.pdf