सर्वात वर

धक्कादायक : नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे २१४६ तर शहरात तर १२९६ नवे रुग्ण

(Corona Update) मागील २४ तासात ६९७ कोरोना मुक्त ,२३०३ कोरोनाचे संशयित तर ९ जणांचा मृत्यू

नाशिक – (Corona Update) नाशिकरांसाठी आजचा कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा चिंता वाढवणारा आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे २१४६ रुग्ण आढळले असून नाशिक शहरातील रुग्णांमध्ये  १२९६ ने वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात एकूण ९ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे.

 आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात १२९६ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ८४२ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत  ९०,५८० रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ८१,३३३ जण कोरोना मुक्त झाले तर ८१७३ जण उपचार घेत आहेत. तर शहरात आज ३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.   

सायंकाळी आलेल्या अहवालात (Corona Update) आज नाशिक शहरात १२९६ तर ग्रामीण भागात ६३१ मालेगाव मनपा विभागात १७४ तर बाह्य ४५अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे २३०३ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ६९७ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.९८ इतके झाले तर शहरात हा रेट ८९.७९ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १०८५१पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ८१७३ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २९६९  अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

 नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-17-MAR-2021.pdf