सर्वात वर

Corona Update : नाशिक जिल्ह्यात आज १५५ शहरात १३५ नवे रुग्ण

Corona Update मागील २४ तासात ३८९ जण कोरोना मुक्त : ७२४ संशयित तर आज ८ जणांचा मृत्यू 

नाशिक- आज (Corona Update) नाशिक जिल्ह्यात १५५ कोरोनाचे एकूण नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी नाशिक शहरात १३५ तर ग्रामीण भागात २० कोरोनाचे(Corona)नवे रुग्ण आढळले आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ७२४ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३८९ जण कोरोना मुक्त झाले.

जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक जिल्ह्यात आज ८ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.२९ इतके झाले तर शहरात हा रेट ९५.७२ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण ३११४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण २०४५ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १३५ मालेगाव मध्ये ०१,नाशिक ग्रामीण १६ ,जिल्ह्या बाह्य ०३ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण १०८५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९४.६४ %,नाशिक शहरात ९५.७२ %,मालेगाव मध्ये ९३.१९ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.७१ % आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.२९ %इतके आहे.

आज शहराची स्थिती (Nashik Corona Update) – शहरात १३५ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण ६७० क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत ६९,८७२ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ६६,८८० जण कोरोना मुक्त झाले तर २०४५ जण उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली.

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती 

१) सत्यम बिल्डिंग -१,दत्तमंदिर रोड,नाशिक येथील ६२ वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे. 

२) सुर्या हॉटेलच्या मागे,गंगापूर,नाशिक येथील ५९ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे


आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ८

नाशिक महानगरपालिका-०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०६

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १८९४

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९४७

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०७

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ६५३

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०३

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – १०८५

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)