सर्वात वर

आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाचे १८८७ तर शहरात ९६५ नवे रुग्ण

मागील २४ तासात जिल्ह्यात २०५७ कोरोना मुक्त : २३३८ कोरोनाचे संशयित : ३६ जणांचा मृत्यू ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.३१ %

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यातील वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या गेले काही दिवसापासून कमी होते आहे असे चित्र दिसायला लागले आहे. आज बऱ्याच दिवसानंतर जिल्ह्यातील एका दिवसांचा कोरोना बधितांचा आकडा 2 हजाराच्या खाली आला आहे आज जिल्ह्यात १८८७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ९६५ नव्या रुग्णात वाढ झाली आहे. जिल्ह्यात आज २०५७ जण कोरोना मुक्त झाले हि नाशिकरांसाठी दिलासादायक बाब आहे.

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९३.३१ % झाली आहे.आज जवळपास २३३८ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३६ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात २० जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात १३ ,मालेगाव महापालिका हद्दीत ३ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ९६५ तर ग्रामीण भागात ९१५ मालेगाव मनपा विभागात ७ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९४.३२ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण २०४८७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १०४९० जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ४५४२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९२.१८ %,नाशिक शहरात ९४.३२ %, मालेगाव मध्ये ८६.६७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९६.०८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९३.३१ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३६

नाशिक महानगरपालिका-१३

मालेगाव महानगरपालिका-०३

नाशिक ग्रामीण-२०

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४०४०

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १७२२

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०८:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक –

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २१११

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- १६

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – २७

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१७९

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ४५४२

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)