सर्वात वर

Corona Update : आज जिल्ह्यात ३२४ तर शहरात १४९ रुग्ण तर १०५५ संशयित

Corona Update : नाशिक जिल्ह्यात आज ४१७ रुग्ण कोरोना मुक्त ; ५ जणांचा मृत्यू ,ग्रामीण भागात १७५ नवे रुग्ण.

नाशिक –(Corona Update) नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात ३२४ कोरोनाचे एकूण नवीन रुग्ण दाखल झाले आहेत. त्यापैकी नाशिक शहरात १४९ तर ग्रामीण भागात १७५ कोरोनाचेनवे रुग्ण आढळले आहे. कालच्या तुलनेत शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी जरी दिसत असली तरी ग्रामीण भागात मात्र आज रुग्ण संख्येत वाढ दिसते आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे १०५५ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ४१७ जण कोरोना मुक्त झाले.

जिल्ह्या रुग्णालायाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोना मुळे आज नाशिक जिल्ह्यात आज ५ जणांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६४ इतके झाले तर शहरात हा रेट ९६.२२ टक्के आहे.सद्य स्थितीत  जिल्ह्यात एकूण २७६७ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १७०९ जण उपचार घेत आहेत.सायंकाळी आलेल्या अहवालात नाशिक शहरात १४९ मालेगाव मध्ये १०,नाशिक ग्रामीण १५८ ,जिल्ह्या बाह्य ०७ रुग्ण आढळले.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६३७ जणांचे अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.दरम्यान कोरोना लसी करणासाठी नाशिकचे प्रशासन सज्ज होते आहे.

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी –नाशिक ग्रामीण मधे ९४.७०,टक्के, नाशिक शहरात ९६.२२ टक्के, मालेगाव मध्ये  ९३.३६ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.५९ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण  ९५.६४ % इतके आहे.

आज शहराची स्थिती –नाशिक शहरात आज १४९ जण  कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून नाशिक शहरातील एकूण ६०५ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत. शहरात आज पर्यंत ७०,४०३ रुग्ण झाले आहेत त्यापैकी ६७,७४१ जण कोरोना मुक्त झाले असून १७०९ जण सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत.अशी माहिती नाशिक महानगर पालिके तर्फे देण्यात आली. 

कोरोनामुळे शहरात मृत्यू झालेल्या रुग्णाची माहिती

१) ५,अस्मिता, शालिमार सोसायटी, पंपिंग स्टेशन, गंगापूर रोड नाशिक येथील ७० वर्षीय वृद्ध पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

२) त्रिवेणी पार्क, इंद्रप्रस्थ,जेलरोड नाशिक येथील ६९ वर्षीय वृद्ध महिलेचे निधन झालेले आहे.

३) फ्लॅट क्रमांक ७, प्राईम रेसिडेन्सी,भाभा नगर,नवशक्ती चौक,कौट घाट,सिडको कॉलनी, नाशिक येथील ५२ वर्षीय पुरुष व्यक्तीचे निधन झालेले आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ०५

नाशिक महानगरपालिका-०३

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०२

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – १९०९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ९५३

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – ०२

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०२१

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०५

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –०४

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२३

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  – ६३७

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)