सर्वात वर

आज नाशिक जिल्ह्यात ४६१९ तर शहरात २५७२ नवे रुग्ण ; २५ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात ६०९० कोरोनाचे संशयित ; ५१६५ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ४३१३ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update)आजपासून महाराष्ट्रात शासनाने मिशन “ब्रेक द चेन” लागू केले आहे. आज रात्री ८ वाजेपासून ३० एप्रिल पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. तसेच दिवसा जमाव बंदी आणि रात्री ८ नंतर संचार बंदी लागू होणार आहे. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडणे शक्य होऊ शकते असे जाणकारांचे मत आहे. 

नाशिक जिल्ह्यात आज ही कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे ४६१९ नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर नाशिक शहरात आज कोरोना २५७२ नवे रुग्ण आढळले आहेत.शहरात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्ये मुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात २५७२ तर ग्रामीण भागात १८५४ मालेगाव मनपा विभागात १२३ तर बाह्य ७० अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ६०९० संशयित रुग्ण आढळले आहे. तर ४३१३ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३. ६२ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.४४ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३०७५३ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १८५४६ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ५१६५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 

(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी(Corona Update) – नाशिक ग्रामीण मधे ८३.०५ %,नाशिक शहरात ८४.४४%, मालेगाव मध्ये ७४.९५% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.३१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.६२ %इतके आहे.

(Corona Update)

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २५

नाशिक महानगरपालिका-१५

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०८

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २४९७

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ११९२

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १७

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५७६९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ३८

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –४८

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२१८

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ५१६५

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/04/AGE-SEX-TEMPLATE-5-APR-2021.pdf