सर्वात वर

आज नाशिक जिल्ह्यात ४६३८ तर शहरात २८९४ नवे रुग्ण ; ३२ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात ६३१५ कोरोनाचे संशयित ; ६७९२ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ३१९१ कोरोना मुक्त 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा बाधितांचा आकडा कमी होत नाही असे दिसत आहे. आज नाशिक जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा ४ हजाराच्या वर असला तरी चिंतेची बाब म्हणजे आज कोरोनामुळे जिल्ह्यात ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. वर्षभरात सर्वात जास्त मृत्यूची नोंद आज नाशिक जिल्ह्यात झाली आहे ही चिंतेची बाब आहे. नाशिक शहरात ही सातत्याने रुग्ण वाढ होते आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वतःबरोबर इतरांची काळजी घेणे महत्वाचे आहे. 

आज जिल्ह्यात कोरोनाचे ४६३८ नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर नाशिक शहरात आज कोरोना २८९४ नवे रुग्ण आढळले आहेत.शहरात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्ये मुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात  २८९४  तर ग्रामीण भागात १५४३ मालेगाव मनपा विभागात ११९तर बाह्य ९२ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ६३१५ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३१९१ जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.२९ इतके झाले तर शहरात हा रेट ८४.२४ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३२१६८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १९२५६ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६७९२ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३२ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे वर्षभरातला हा उचांक आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)– नाशिक ग्रामीण मधे ८२.४३ %,नाशिक शहरात ८४.२४%, मालेगाव मध्ये ७४.८३% तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.१५ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.२९ %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ३२

नाशिक महानगरपालिका-११

मालेगाव महानगरपालिका-०३

नाशिक ग्रामीण-१६

जिल्हा बाह्य-०२

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २५२९

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १२०३

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १३

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५९६५

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २२

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५९

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –२५६

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ६७९२

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/04/AGE-SEX-TEMPLATE-6-APR-2021.pdf