सर्वात वर

आज नाशिक जिल्ह्यात ४७७२ तर शहरात ३०७२ नवे रुग्ण ;२५ जणांचा मृत्यू

मागील २४ तासात ५९८५ कोरोनाचे संशयित ; ६०३९ अहवाल येणे प्रतिक्षेत  तर ३७२० कोरोना मुक्त

 नाशिक – (Corona Update)नाशिक जिल्यात आज ही  कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये काल पेक्षा जास्त वाढ झाली आहे. आज जिल्ह्यात कोरोनाचे ४७७२ नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. तर नाशिक शहरात आज कोरोना  ३०७२नवे रुग्ण आढळले आहेत.शहरात वाढणाऱ्या रुग्णांच्या संख्ये मुळे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. आज राज्यशासनाने कडक निर्बंध जाहीर केले असून शुक्रवारी रात्री ८ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत राज्यात कडक लॉक डाऊन असणार आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३०७२ तर ग्रामीण भागात १५६५ मालेगाव मनपा विभागात ७१ तर बाह्य ६४ अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे.गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोनाचे ५९८५ संशयित रुग्ण आढळले आहे. तर ३७२० जण कोरोना मुक्त झाले. नाशिक जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३. ४० इतके झाले तर शहरात हा रेट ८४.५२ टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण ३०४७२ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण १८०६९ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण ६०३९ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.तर आज जिल्ह्यात कोरोनामुळे २५ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनीदिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी – नाशिक ग्रामीण मधे ८२.०७ %,नाशिक शहरात ८४.५२%,मालेगाव मध्ये ७५.६७ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८८.६१ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८३.४० %इतके आहे.

आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – २५

नाशिक महानगरपालिका-११

मालेगाव महानगरपालिका-०४

नाशिक ग्रामीण-०९

जिल्हा बाह्य-०१

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – २४७२

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ११७७

नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ९:३०वा पर्यंत) (Corona Update)  

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – १४

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ५७६९

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- २३

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –५

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१२४

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  ६०३९

नाशिक जिल्हा ,शहरात  कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)