सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ४ हजार ९१८ नवे रुग्ण तर २५ जणांचा मृत्यू

शहरात २१८१ कोरोनाचे नवे रुग्ण 

नाशिक – (Corona Update) नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा विस्फोट झाला असून कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. आज पुन्हा एकदा जिल्ह्यात कोरोनाच्या  रुग्णांचा उच्चांक झाला असून दिवसभरात ४ हजार ९१८ रुग्ण आढळल्याने नाशिककरांची  चिंता अधिकच वाढली आहे.  शहरातल्या रुग्ण संख्येत ही मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून आज कोरोनाच्या रुग्ण संख्येत २१८१ ने वाढ झाली आहे.चिंतेची बाब म्हणजे कोरोनामुळे आज २५ जणांचा मृत्यू झाला आहे.गेल्या वर्षपासून एका दिवसात कोरोना मुळे आज सर्वाधिक मृत्यू झाले आहे.आज १५४८ रुग्ण कोरोना मुक्त झाले असून अद्याप ५ हजार ९१९ संशयितांचे अहवाल येणे बाकी आहेत.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 

आज शहराची स्थिती (Corona Update)  – शहरात २१८१ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.नाशिक शहरातील एकूण १२९४ क्षेत्र  प्रतिबंधित करण्यात आली आहेत.शहरात आज पर्यंत १,०६,९१३ रुग्ण झाले आहेत. त्यापैकी ९१,९२६ जण कोरोना मुक्त झाले तर १३,८६७जण उपचार घेत आहेत.तर शहरात आज ०८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.अशी माहिती नाशिक महानगरपालिके तर्फे देण्यात आली

(Corona Update)  

आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 4918

नाशिक मनपा-      2181

नाशिक ग्रामीण-     2498

मालेगाव मनपा-     0185

जिल्हा बाह्य-         0054

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 2308
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -25

नाशिक मनपा-        08

मालेगाव मनपा-      04

नाशिक ग्रामीण-      12

जिल्हा बाह्य-           01

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या 

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)  

http://janasthan.com/wp-content/uploads/2021/03/AGE-SEX-TEMPLATE-27-MAR-2021.pdf