सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात आज कोरोनाचे ६७७ तर शहरात ३१७ नवे रुग्ण 

मागील २४ तासात जिल्ह्यात १३४९ कोरोना मुक्त : १२२७ कोरोनाचे संशयित;रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.८३ % तर ४३ जणांचा मृत्यू

नाशिक – (Corona Update)  आज नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठ्या प्रमाणात घट दिसून आली आहे. जिल्हा प्रशासनाने लावलेल्या निर्बंधांना नाशिककरांनी दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रुग्ण संख्येत घट होतांना दिसत आहे. गेल्या २४ तासात जिल्ह्यात कोरोना संशयितांच्या एकूण ११ हजार ७७७ चाचण्या झाल्या त्यापैकी ६७७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हिटी रेट हा ५.७५ टक्के आला असून हा रेट ५ टक्क्यांच्या खाली असावा ते उद्दीष्ट आहे असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. नाशिकरांनी त्रिसूत्रीचे केल्यास आपण करोना मुक्ती कडे वाटचाल करू असे जाणकारांचे मत आहे. 

नाशिक जिल्ह्यात आज ६७७ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात ३१७ नव्या रुग्णात वाढ झाली तर जिल्ह्यात आज १३४९ जण कोरोना मुक्त झाले. 

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९४.८३ % झाली आहे.आज जवळपास १२२७ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ४३ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात १७ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात २१ ,मालेगाव महापालिका हद्दीत ५ रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात ३१७ तर ग्रामीण भागात ३५० मालेगाव मनपा विभागात ११ तर बाह्य ००अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९६.६३ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १५,२४४ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ५५७५ जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे  एकूण २३७५ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९२.४१ %,नाशिक शहरात ९६.६३ %, मालेगाव मध्ये ८९.०३ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९८.०५%आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९४.८३ %इतके आहे.

(Corona Update)  आज रोजी कळवण्यात आलेले एकूण मृत्यु – ४३

नाशिक महानगरपालिका-२१

मालेगाव महानगरपालिका-०५

नाशिक ग्रामीण-१७

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ४४१४

नाशिक शहरात एकूण मृत्यू – १८७०

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०७:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक –

२)नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १०७४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- ०९

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३८

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१०२

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  २३७५

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)