सर्वात वर

त्रंबकेश्वर कोरोना मुक्त : नाशिक जिल्ह्यातील काही तालुक्यांची कोरोनामुक्तीकडे वाटचाल

जिल्ह्यात आजपर्यंत ३ लाख ८० हजार १७४ रुग्ण कोरोनामुक्त : उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये  २१६ ने घट : सद्यस्थितीत जिल्यात ४ हजार ५९३ रुग्णांवर उपचार सुरू

नाशिक – (Corona Update) बारा जोतिर्लिंगापैकी एक असलेले जिल्यातील त्रंबकेश्वर आता कोरोना मुक्त झाले आहे.आज जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून आलेल्या अहवालात त्रंबकेश्वर मध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याने त्रंबकेश्वर आता कोरोनामुक्त झाले आहे.त्याचप्रमाणे पेठ आणि सुरगाणा हि कोरोनामुक्तीकडे वाटचाल करत आहेत.गेल्या काही महिन्यापासून ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णाचे प्रमाण अधिक होते ते प्रमाण आता कमी होतांना दिसत आहे. 

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार (Corona Update) जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार १७४ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत ४ हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच  उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये २१६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत ५ हजार ५८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा  नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

(Corona Update) उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ३०१,  बागलाण १६३, चांदवड २६४, देवळा ५९, दिंडोरी २६४, इगतपुरी ३४, कळवण ९०, मालेगाव १५६, नांदगाव १२९, निफाड ४२६, पेठ ०८, सिन्नर ६४१, सुरगाणा १५, त्र्यंबकेश्वर ००, येवला ६८ असे एकूण २ हजार ६१८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात १ हजार ८३९ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १३५ तर जिल्ह्याबाहेरील ०१  रुग्ण असून असे एकूण ४  हजार ५९३  रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ३ लाख ९० हजार ३५४ रुग्ण आढळून आले आहेत.

(Corona Update) रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ९६.४४ टक्के, नाशिक शहरात ९८.०७ टक्के, मालेगाव मध्ये ९६.३० टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.७७  टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.३९ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण २ हजार ६४०  नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून २ हजार ५०३ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३२६  व जिल्हा बाहेरील ११८ अशा एकूण ५ हजार ५८७  रुग्णांचा मृत्यु झाला आहे. 

लक्षणीय :

◼️३ लाख  ९०  हजार ३५४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३ लाख ८० हजार १७४  रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

◼️सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले  ४  हजार ५९३  पॉझिटिव्ह रुग्ण.

◼️जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७. ३९ टक्के.

(वरील आकडेवारी  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)