सर्वात वर

Corona Vaccine : आज १३ शहरांमध्ये पोहचणार ‘कोविशिल्ड’ चे डोस

बातमीच्या वर

पुण्याहून लसीचे (Corona Vaccine) डोस घेऊन पहिले विमान दिल्लीत दाखल 

पुणे – पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीच्या (Corona Vaccine)आपत्कालीन वापरासाठी केंद्रसरकारने परवानगी दिल्यानंतर कोरोनावर परिणामकारक ठरणाऱ्या या लसीच्या वितरणाला सुरुवात करण्यात आली आहे.पहिल्या टप्प्यातील सहा कंटेनर आज (१२ जानेवारी २०२१) रोजी एअर इंडिया, स्पाईसजेट आणि इंडिगो या तीन विमान कंपन्यांच्या नऊ विमानांमधून १३ शहरांमध्ये लसीचे ५६.५ लाख डोस पाठवण्यात येणार आहेत.अशी माहिती केंद्रीय उड्डाण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली आहे. 

भारतातील दोन लसींना केंद्र सरकारने परवानगी दिल्यानंतर आता देशात लसीकरणाच्या कार्यक्रमाने गती पकडली आहे.या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात कोविड योध्यांना हि लस देण्यात येणार आहे. तसेच देशातील ३ कोटी लोकांना ही लस मोफत मिळणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच तशी घोषणा केली आहे. 

पुण्यातून तीन कंपन्यांच्या नऊ विमानातून हे डोस (Corona Vaccine) विविध शहरांमध्ये रवाना करण्यात येणार आहे. देशात मागील आठवड्यात लसीकरण मोहिमेची ड्राय रन राबविण्यात आली होती. लसीकरण मोहिमेसाठी यंत्रणा सज्ज झाली असून १६ जानेवारी पासून प्रत्यक्ष लसीकरण मोहिमेला सुरुवात होणार आहे. 

पुण्यातून लसीचे डोस (Corona Vaccine) घेऊन  विमानं उड्डाणं भरणार असून, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, गुवहाटी, शिलाँग, अहमदाबाद, हैदराबाद, विजयवाडा, भुवनेश्वर, पाटणा बंगळुरू, लखनौ आणि चंदीगढ या शहरात लसीचे डोस पोहोचवले जाणार आहेत.

दरम्यान आज सकाळी पाच वाजता पुण्याच्या सीरम इन्स्टिट्युटमधून  रवाना झालेली ‘कोव्हिशिल्ड’ लशीचे डोस कंटेनरमधून दिल्लीसाठी रवाना करण्यात आले. ही लस घेऊन ‘स्पाईस जेट’चं विमान सकाळी १०.०० वाजता दिल्ली विमानतळावर दाखल झाले आहे.

११ जानेवारी रोजी ‘सीरम इन्स्टिट्युट ‘कडून आतापर्यंत  १.१ कोटी लशीचे डोस खरेदी करण्यात आले आहे.एप्रिल २०२१ पर्यंत आणखी ४.५ कोटी डोस खरेदी करण्यात येणार आहेत.केंद्रसरकार कडून सीरम इन्स्टिट्युट आणि ‘भारत बायोटेक’ यांचे  कोव्हिड १९ च्या लसींचे जवळपास सहा कोटींहून अधिक डोस खरेदी करण्यात येणार आहेत.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली