सर्वात वर

CORONA VACCINE UPDATE : कोरोनावरील लस आली,पुढच्या आठवड्यात लसीकरण

नवी दिल्ली- कोरोनावरील जगातील पहिल्या लसीचे पुढील आठवड्यापासून उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे.ब्रिटन सरकारने फायझरच्या बायोएनटेकच्या लशीला परवानगी दिली असून, पुढच्या आठवड्यापासून ब्रिटनमध्ये नागरिकांना लस दिली जाणार आहे. करोनावरील लशीला परवानगी देणारा ब्रिटन पहिला देश ठरला आहे.ब्रिटनचे आरोग्यमंत्री मॅट हँकॉक यांनी हि माहिती दिली. 

कोरोनावरील हि लस फायझर कंपनी आणि जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. ही लस ९० टक्क्यांहून अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे.ही लस एका वर्षासाठी सुरक्षा देणार असून वर्षभरानंतर पुन्हा एकदा लस घ्यावी लागणार असल्याचे म्हटले जाते.अमेरिका आणि युरोपियन युनियनकडून लस निर्मितीचे प्रयत्न सुरूआहेत. युरोप किंवा अमेरिकेत सर्वात आधी लस येण्याचा अंदाज व्यक्त केला जात होता पण आता ब्रिटनने बाजी मारली असून करोनावरील लशीला मान्यता देणारा ब्रिटन जगातील पहिला देश ठरला आहे.फायजरच्या लस चाचणीचा संपूर्ण डेटा येत्या काही दिवसांत उपलब्ध होण्याची शक्यता आहे.