सर्वात वर

नाशिक मध्ये कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह करण्याचा प्रकार उघडकीस ?

जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाई कडे लक्ष 

नाशिक – अमरावती नंतर नाशिक मध्ये काही खासगी लॅब कडून कोरोनाचे निगेटिव्ह रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona’s Negative Report Positive) करण्याचा प्रकार असल्याचा प्रकार तपासणीतून समोर येत आहे..या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली असून मोठ्या  रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता आहे.याबाबतचा अहवाल नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांना प्राप्त झाला असून ते या लॅब वर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

कोरोनाच्या रुग्णसंख्येत काही दिवसापासून सातत्याने वाढ होत आहे.जिल्हा प्रशासनाने स्वाबचे प्रमाणही वाढवले आहे.परंतु काही जण सरकारी रुग्णालयात जाण्या ऐवजी खासगी लॅबमध्ये जाणे पसंद करतात. शहर आणि जिल्हा सरकारी लॅब मध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येणाचे प्रमाण केवळ सात टक्के असतांना खासगी लॅब मध्ये हेच प्रमाण २८ टक्के असल्याचे निदर्शनास आल्याने पालकमंत्री छगन भुजबळ यांनी खासगी लॅबचे सॅम्पल पुन्हा तपासण्याचे आदेश दिल्या नंतर हा अहवाल समोर आला आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सरकारी लॅब मध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रिपोर्ट केवळ तीन टक्के असताना हे रिपोर्ट खासगी लॅब मध्ये २८ टक्के असल्याची गंभीरबाब पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासमोर आरोग्य यंत्रणेने काही दिवसापूर्वी आणली होती.या गोष्टीला आता दुजोरा मिळाला असून खासगी लॅब ने दिलेल्या पॉझिटिव्ह रिपोर्ट पैकी तब्बल ४५ टक्के रुग्णांच्या रिपोर्टची पुनर्चचाणी केली असता.हे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची गंभीरबाब महानगर पालिकेच्या वैद्यकीय पथकाला आढळून आली आहे.त्यामुळे निगेटिव्ह रिपोर्ट चे पॉझिटिव्ह (Corona’s Negative Report Positive) करणाऱ्या खासगी लॅबच्या या रॅकेटचा भांडाफोड होणार आहे. या मध्ये काही हॉस्पिटलचीही चौकशी होणार असल्याचे समजते आहे. 

खाजगी लॅब मधील तपासणीच्या तफावत बाबत अहवाल नाशिक मनपा व जिल्हा शल्य चिकित्सक या दोघांकडून प्राप्त झाले आहेत त्यावर यथोचित कार्यवाही करण्यात येत आहे. 
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक