सर्वात वर

Big News Today : महाराष्ट्रात २२ डिसेंबर पासून रात्रीचा कर्फ्यू 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मोठा निर्णय 

मुंबई- ब्रिटन मध्ये नवीन कोरोना व्हायरस (Coronavirus)आढळून आला त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महानरपालिका क्षेत्रात २२ डिसेंबर पासून रात्री ११ ते सकाळी ६ या वेळात कर्फ्यू  लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.. उद्या (२२ डिसेंबर) पासून ५ जानेवारी पर्यंत रात्री ११ ते सकाळी ६ वाजेपर्यंत कर्फ्यू असणार त्यामुळे ३१ डिसेंबर साजरा करण्याचा ज्यांनी प्लॅन केला आहे त्यांना त्यांचे कार्यक्रम रद्द करावे लागणार आहे. 

ब्रिटनमध्ये करोना व्हायरसचा(Coronavirus) नवा प्रकार आढळून आला आहे. त्यामुळे ब्रिटनमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू  लागू करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

ब्रिटन मध्ये सापडलेला नवा कोरोना (Coronavirus) व्हायरस वेगाने पसरतो आहे तो किती गंभीर आहे या येत्या काही दिवसात कळेल. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महाराष्ट्रात रात्रीचा कर्फ्यू  लागू करण्याचा निर्णय घेतल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आजपासूनच महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कडक तपासणी करण्यात येणार आहे.यूरोप सह मध्यपूर्व देशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांना १४ दिवस संस्थात्मक क्वारंटाइन सक्तीचे करण्यात आले आहे. १४ दिवसाचा क्वारंटाइनचा काला असणार आहे.या प्रवाशांची पाचव्या किंवा सातव्या दिवशी कोरोनाची (RTPCR) चाचणी केली जाईल. त्यांचा १४ दिवसाचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण झाल्या नंतरच  त्यांना घरी सोडण्यात येईल.

कोरोनाच्या या नव्या व्हायरस (Coronavirus) मुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असून पुढील १५ दिवस अधिक सतर्क रहावे लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्र्यांच्या सरकारी निवास्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर  झालेल्या बैठकीस मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे मुख्य  सल्लागार अजोय मेहता, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव मनोज सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह, प्रधान सचिव विकास खारगे, मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरव विजय, राज्य टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक, सदस्य डॉ. शशांक जोशी, डॉ. अविनाश सुपे, डॉ. राहूल पंडीत, मुख्यमंत्र्यांचे पुणे विभागाचे सल्लागार दीपक म्हैसेकर आदी यावेळी उपस्थित होते.