सर्वात वर

उद्यापासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षावरील आजारी व्यक्तींना मिळणार कोरोनाची लस

मुंबई – देशात उद्या पासून (१ मार्च २०२१)पासून ज्येष्ठ नागरिकांसह ४५ वर्षावरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लस (Coronavirus Vaccination) मिळणार आहे.सरकारी रुग्णालयात हि लस मोफत मिळणार असून खासगी रुग्णालयांत लसीचा एक डोस घेण्यासाठी २५० रुपये शुल्क लागतील. म्हणजेच, दोन डोससाठी ५०० रुपयेखर्च करावे लागणार आहे.

लसीकरणाच्या नोंदणीसाठी कोविन (Co-Win 2.0) ॲप आणि वेब पोर्टल cowin.gov.in वर लाभार्थी नोंदणी करू शकतील.नोंदणीसाठी आपला फोन किंवा इतर कुणाचाही मोबाइल वापरू शकता येणार आहे . एका मोबाइल वरून १ ते ४ जणांची नोंदणी करता येणार आहे. ४५ वर्षांवरील लोकांना लसीकरणासाठी (Coronavirus Vaccination) २० गंभीर आजारांची यादी सरकारने जाहीर करण्यात आली आहे. या मध्ये प्रामुख्याने कॅन्सर , बायपास सर्जरी, न्यूरॉलॉजिकल डिसऑर्डर, ल्युकेमिया, कमी प्रतिकारशक्ती, मधुमेह, हायपरटेन्शन, लिव्हर, किडनी, हृदयविकार,सिकलसेल अॅनिमिया, थॅलेसेमिया, एचआयव्ही सारख्या गंभीर आजारांचा समावेश आहे. विविध उपचारांत दिव्यांग झालेल्यांनाही लसीचा डोस देता येऊ शकेल.  

डोस घेताना काय कागदपत्र लागतील ! 
ज्या लोकांचे वय ६० वर्षांहून अधिक आहे त्यांना आपले ओळखपत्र  ठेवावे लागेल. ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना नोंदणीकृत डॉक्टरचे प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. यात संबंधित आजाराची संपूर्ण माहिती असली पाहिजे.