सर्वात वर

Coronavirus Vaccine : कोविड लसीकरण मोहिमेला सुरूवात शनिवार पासून सुरुवात

(Covid Vaccination Campaign)पहिल्या फेरीत १९ हजार ५४८ फ्रंट लाईन आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण : जिल्हाधिकारी सूरज मांढरे

नाशिक – कोरोनाच्या महामारीला प्रतिबंध करण्यासाठी अंतिम उपाय म्हणून जय लसीची सर्वाना प्रतीक्षा होती ती कोविड लसीकरणाची (Coronavirus Vaccine)मोहिमेला उद्या शनिवार (16 जानेवारी) सुरूवात होणार असून या मोहिमेत कोरेाना काळात नाशिक जिल्ह्यात अविरतपणे फ्रंटलाईनवर काम करणाऱ्या १९ हजार ५४८ आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरण करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात कोविड लसीकरणाच्या अनुषंगाने पूर्व तयारीची जिल्हा टास्क फोर्स समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी सुरज मांढरे बोलत होते. यावेळी  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, नाशिक आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी वर्षा मिना, कळवण आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी विकास मिना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर,  महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. बापुसाहेब नागरगोजे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी सिरम इन्स्टीट्युट ऑफ इंडिया, पुणे कंपनीने तयार केलेल्या ‘कोविडशिल्ड’ (Coronavirus Vaccine) या लसीचे जिल्ह्याला ४३ हजार ४४० डोसेजेस प्राप्त झाली असून या लसीकरणाचा उद्या पासून (16 जानेवारी) प्रत्यक्ष प्रारंभ होत आहे. कोविड लसीकरणाच्या पहिल्या फेरीत लसीकरणासाठी जिल्ह्यातून ३६ हजार १७८ हेल्थ केअर वर्करची नोंदणी करण्यात आली आहे. यातील एका व्यक्तिला  दोन डोस याप्रमाणे पहिल्या फेरीत १९ हजार ५४८ हेल्थ केअर वर्करला लसीकरण करण्यात येणार आहे. 

या लसीकरणाअंतर्गत गर्भवती महिला व स्तनदा माता यांना लसीकरण करण्यात येणार नाही.तसेच लसीकरणासाठी जिल्ह्यात आज पर्यंत १३ केंद्र निश्चित करण्यात आली असून या एका केंद्रावर एका दिवसात १ हजार ३०० डोसेस देण्यात येणार असून एका आठवड्यात चार दिवस लसीकरण करण्यात येणार आहे. यानुसार लसीकरणाच्या पहिल्या फेरीची प्रक्रीया पूर्ण करण्यासाठी साधारण एक ते दीड महिन्याचा कालावधी लागणे अपेक्षित आहे, असे जिल्हाधिकारी  मांढरे यांनी स्पष्ट केले.

 लसीकरणाच्या प्रक्रीये दरम्यान लसीकरणानंतर अतिदक्षतेची परिस्थिती निर्माण झाल्यास पूर्व प्रत्येक केंद्रावर १०२ व १०८ या रुग्णवाहिकेची सेवा २४ तासांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या अनुषंगानेच लसीकरणानंतर लाभार्थ्याला परिक्षण कालावधी दरम्यान काही विपरीत परिणाम जाणवल्यास पुढील उपचार घेण्यासाठी जिल्हा रुग्णालय, संदर्भसेवा रूग्णालय, एनडीएमव्हीपी मेडिकल कॉलेज नाशिक व एसएमबीटी धामणगाव या रूग्णालयात व्यवस्था करण्यात आली आहे. 

त्याप्रमाणे जिल्हा व तालुकापातळीवर लसीकरण मोहिमेच्या अनुषंगाने नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. लसीकरणाच्या प्रत्येक केंद्रावर सुरू असणाऱ्या लसीकरण (Coronavirus Vaccine) मोहिमेची माहिती देण्यासाठी एक पर्यवेक्षक अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात यावी आणि लसीकरण प्रक्रीयेत सहभागी असलेल्या सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी व्यवस्थीतरित्या पार पाडावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी यावेळी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

लसीकरणाच्या पहिल्या फेरीत ग्रामीण भागातील ६ केंद्राचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार या केंद्रावर आवश्यकत्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लसीकरणाच्या लाभार्थ्यांना लसीकरणा विषयीची माहिती देणारे फलक संबंधित केंद्रावर लावण्यात आले आहेत. तसेच उद्या पासून सुरू होणारी लसीकरणाची मोहिम यशस्वी करण्यासाठी  आवश्यक सर्व नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी बैठकीत दिली.

लसीकरण केंद्रावर लसीकरणा दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही तसेच अनधिकृत व्यक्ती लसीकरण केंद्रात प्रवेश करणार नाही यासाठी पोलिस यंत्रणेमार्फत आवश्यक सर्व खबरदारी घेण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी बैठकीत सांगितले.    

अशी आहेत लसीकरण केंद्र

1. जिल्हा रुग्णालय, नाशिक 

2. सामान्य रुग्णालय, मालेगाव

3. उपजिल्हा रुग्णालय,कळवण

4. उपजिल्हा रुग्णालय, निफाड 

5. उपजिल्हा रुग्णालय, चांदवड

6. उपजिल्हा रुग्णालय, येवला

7. इंदिरा गांधी हॉस्पिटल, नाशिक

8. शहरी आरोग्य केंद्र, नवीन बिटको, नाशिक

9. शहरी आरोग्य केंद्र, जे. डी. सी बिटको, नाशिक

10.  शहरी आरोग्य केंद्र, कॅम्प वॉर्ड मालेगाव

11. शहरी आरोग्य केंद्र, निमा 1 मालेगाव

12. शहरी आरोग्य केंद्र, रमजानपुरा मालेगाव

13. शहरी आरोग्य केंद्र सोयगाव, मालेगाव