सर्वात वर

Coronavirus Vaccine लसीकरणासाठी नाशिकमध्ये दाखल

(Coronavirus Vaccine) प्रशासनाची तयारी पूर्ण : १६ जानेवारी पासून सुरु होणार लसीकरण 

नाशिक- कोरोनाची लस कधी येणार याची नाशिककर वाट बघत होते अखेर आता प्रतीक्षा संपली असून पुण्यावरून सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीची कोविडशील्ड लस (Coronavirus Vaccine) आज नाशिकमध्ये दाखल झाली आहे. 

महाराष्ट्र साठी एकूण नऊ लाख ३६ हजार पन्नास डोसेस (Coronavirus Vaccine) उपलब्ध करण्यात आले असून त्यापैकी नाशिक जिल्ह्या करिता ४३ हजार ४४० डोस मिळाले आहेत. नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्या मार्गदर्शना नुसार लसीकरण मोहिमेची तयारी पूर्ण झाली असून कोरोनाच्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी नाशिकचे प्रशासन आता सज्ज झाले आहे. १६ जानेवारीपासून लसीकरणास सुरूवात करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहे.

नाशिक जिल्ह्यामध्ये महानगरपालिका व ग्रामीण भाग मिळून एकूण १६ ठिकाणी लसीकरण केंद्रांना मंजुरी मिळाली आहे.पहिल्या फेरीत जिल्ह्यातील शासकीय खाजगी संस्थांमधील आरोग्‍य कर्मचारी यांना प्राधान्याने लसीकरण देण्‍यात येणार असून नाशिक जिल्ह्यात एकूण १८१३५ शासकीय आरोग्य कर्मचारी १२४८० संस्थांमधील आरोग्य कर्मचारी यांची नोंद करण्यात आलेली आहे जिल्ह्यात आत्तापर्यंत त् १०२९ जणांना  प्रशिक्षण देण्यात आले आहे हे जिल्ह्यात लसीकरण मोहिमे अंतर्गत २१० आय एल आर उपलब्ध आहेत

अशी होणार लसीकरण मोहिमेला सुरुवात  !

लसीकरण केंद्रावर पहिल्या रूममध्ये वेटिंग रूम म्हणून संबोधण्यात येईल या ठिकाणी  टोकन नुसार लाभार्थ्याला सहा फुटाच्या अंतरावर सोशल डिस्टन्स नियमाचे पालन करून बसण्याची व्यवस्था केलेली असेल.याच रूममध्ये सुरूवातीला येणाऱ्या प्रत्येक लाभार्थीचे तपमान घेण्यात येईल येईल तसेच सँनीटाईज केले जाईल प्रत्येक रूममध्ये प्रवेश करताना लस घेणाऱ्याला पूर्णवेळ मास्क वापरणे बंधनकारक असेल. 

दुसऱ्या रूम ला वँक्सिंन रूम म्हणून संबोधण्यात येईल येईल त्याच रूम मध्ये लसीकरण करण्यात येणार असून लाभार्थी या रूम मध्ये आल्यावर सर्वप्रथम ओळख पत्रानुसार ओळख निश्चित करण्यात आल्यावर सी ओ विन ॲप मध्ये नोंद करण्यात येईल लाभार्थ्यांना लसी विषयी संपूर्ण कल्पना दिल्यावर लसीकरण केले जाईल. 

तिसऱ्या रूम  आँबजर्वेशन रूम म्हणून तिला संबोधण्यात येईल यामध्ये लस घेऊन आलेल्या व्यक्तीला तीस मिनिटे बसणे अनिवार्य असणार आहे हे तेथेदेखील लसघेण्याऱ्या व्यक्तींना सोशल डिस्टंसिंगचे पालन करून  सहा फुटाचे अंतर ठेऊन बसण्याची व्यवस्था केलेली आहे. लसीकरणानंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीचे चे निरीक्षण करण्यासाठी सदर रूम मध्ये लाभार्थींना बसवले जाणार आहे 

लसीकरण केंद्र पुढील प्रमाणे 
1 जिल्हा रुग्णालय नाशिक
2 सामान्य रुग्णालय मालेगाव
3 उपजिल्हा रुग्णालय कळवण
4 उप जिल्हा रुग्णालय निफाड
5 उपजिल्हा रुग्णालय चांदवड
6 उपजिल्हा रुग्णालय येवला
7 ग्रामीण रुग्णालय दिंडोरी
8 प्राथमिक आरोग्य केंद्र सय्यद पिंपरी
9 इंदिरा गांधी हॉस्पिटल नाशिक
10 शहरी आरोग्य केंद्र सातपूर
11 शहरी आरोग्य केंद्र नवीन बिटको नाशिक
12 शहरी आरोग्य केंद्र जेडीसी बिटको नाशिक
13 शहरी आरोग्य केंद्र निमा 1 मालेगाव
14 शहरी आरोग्य केंद्र रमजान पुरा मालेगाव
15 शहरी आरोग्य केंद्र सोयगाव मालेगाव

या ठिकाणी लसीकरण (Coronavirus Vaccine) मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी आज सदर संस्थांना जिल्हा मार्फत लसी साठी लागणारे नियोजित तापमान दोन अंश ते आठ अंश राखून लस वितरित करण्यात येणार आहे.प्रत्येक केंद्रावर नोडल अधिकारी देखील निश्चित करण्यात आलेले असून प्रत्येक संस्थानिहाय पाच अधिकारी व कर्मचारी यांची एक टीम तयार करण्यात आली आहे संपूर्ण टीमने मास्क व ग्लोज वापरणे बंधनकारक आहे. १६ तारखेला सकाळी १० वाजता प्रत्यक्ष  लसीकरणाला सुरुवात होणार आहे.