सर्वात वर

… तो दिवस उजाडला : जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेला देशात सुरुवात

Coronavirus Vaccine India : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लसीकरण मोहिमेचे उदघाटन ,तर महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 

मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या लसीची वाट बघणाऱ्या नागरिकांसाठी आज तो दिवस उजाडला संपूर्ण भारतात कोरोनाच्या लसीकरणाला (Coronavirus Vaccine India) सुरुवात झाली आहे.जगातील सर्वात मोठा हा लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम असणार आहे.आज सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मोहिमेचे उद्घाटन झाले.करोनायोद्धय़ांना सर्वात आधी लशीचा लाभ मिळणार असून, त्यापैकी काही जणांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.लसीकरण मोहिमेच्या (Coronavirus Vaccine India) सुरुवातीला लशींचा पुरवठा आणि वितरणावर देखरेख ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ‘को-विन’ अ‍ॅपचे लोकार्पणही पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले. आज महाराष्ट्रातही राज्यव्यापी लसीकरण मोहिमेची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते आज मुंबई महापालिकेच्या वांद्रे-कुर्ला संकुलामधील कोविड सुविधा केंद्रात झाली.

आज आपण एक क्रांतिकारक पाऊल टाकत असून जीवाची पर्वा न करता रुग्णाची सेवा करण्यासाठी ज्यांनी दिवसरात्र झोकून दिले अशा कोव्हीड योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले. 

मुख्यमंत्री पुढे म्हणले गेल्या अनेक दिवस आपण लस येणार-येणार असे ऐकत होतो पण लस काही येत नव्हती.आज लस आपल्या हातात आली आहे. परंतु नागरिकांना एक मी नम्रपणे सर्वांना सांगू इच्छितो, अजूनही कोरोनाचे संकट टळलेलं नाही.अनेकांना असं वाटू शकतं की आता लस आली त्यामुळे काही होऊ शकतं. परंतू असं काही नाही आता सुरूवात झाली आहे, सर्व नागरिकांना लस मिळेपर्यंत काही दिवस -महिने लागणार आहेत. या लसींचा प्रभाव किती काळ राहणार हे काही दिवसानंतर कळणार आहे. लस तर आलेली असली तरी सर्वांत उत्तम लस म्हणजे आपल्या तोंडावर असलेला मास्क हीच आहे. त्यामुळे सर्वानी  मास्क घालणं सोडून जमणार नाही. 

लस घेतल्यानंतर देखील मास्क वापरावाच लागणार आहे .कारण, आतापर्यंत आपण या संकटाला जे सामोरं गेलो आहोत, ते तीन सूत्र पाळावे लागणार आहे.त्याच बळावर आपण कोरोना महामारीचा सामना करू शकतो ते तीन सूत्र म्हणजे मास्क घाला, हात धूवा व  सुरक्षित अंतर ठेवा. या तीन सूत्रांचा जर आपल्याला विसर पडला, तर मग मात्र पुन्हा हे संकट अधिक वेगाने पुन्हा य्ण्याचा धोका होऊ शकतो.आता सुरूवात झाली आहे पण करोनाचा शेवट आपल्याला करायचा आहे.” असं देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याप्रसंगी म्हणाले.मुंबई मधील एकूण ९ केंद्रांवरील ४० बूथवर लसीकरण केले जाणार आहे.

मुंबई मधील बीकेसीमधी लसीकरण केंद्रावर महापौर किशोरी पेडणेकर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांची प्रमुख उपस्थिती होती.