सर्वात वर

शरद पवार यांनी घेतली कोरोना प्रतिबंधक लस

मुंबई  – देशभरात आज कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरु झाला आहे.आज दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मुंबईतील जे जे हॉस्पिटल मध्ये जाऊन  करोना लसीचा (Covid 19 Vaccine) पहिला डोस घेतला.या आधी आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही दिल्लीमध्ये करोना लसीचा पहिला डोस घेतला.मोदींप्रमाणेच शरद पवार यांनीही सोशल मिडियावरून या लसीकरणा संदर्भातील व्हिडीओ पोस्ट करत माहिती दिली.  

देशात १६ जानेवारी पासून लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात हेल्थ वर्कर्स यांना लस देण्यात आली.तिसरा टप्पा आज पासून सुरु झाला आहे. या मध्ये ६० वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिकांना लस देण्यास सुरुवात झाली आहे.लस घेण्यास पात्र असणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांनी लवकरात लवकर लस   (Covid 19 Vaccine)  घेऊन कोरोना विरुद्धच्या लढाईत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन शरद पवार (Sharad Pawar) यांनी नागरिकांना केला आहे.

आज सकाळीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही लस घेतली आहे.त्यावेळी  करोनाविरोधातील जागतिक लढाईला बळ देण्यासाठी आपल्या डॉक्टर आणि वैज्ञानिकांनी ज्या जलगतीने काम केलं त्यांचे कौतुक करणारे ट्विट केले आहे. त्याचप्रमाणे, “जे जे लोकं लसीकरणासाठी पात्र आहेत त्यांनी लस (Covid १९ Vaccine)घ्यावी असं मी आवाहन करतो. आपण मिळून भारताला करोनामुक्त करुयात” असंही मोदी या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.