सर्वात वर

लॉजिक इव्हेंट्सतर्फे शनिवारी इंटर आयटी बॉक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन

नाशिक – लॉजिक् इव्हेंट्सतर्फे मुंबईनाका येथील बॉक्स पार्क  मैदानावर ५ षटकांच्या मर्यादित क्रिकेट सामन्यांचे (Cricket Matche) (शनिवार दि.६ फेब्रुवारी ) रोजी आयोजन करण्यात आले आहे. प्रथम पारितोषिक रोख १५ हजार रु. तर द्वितीय १० हजार रोख आणि चषक असे बक्षिसाचे स्वरूप असून एकूण सोळा संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे, अशी माहिती संयोजक योगेश सोननीस, अविनाश नेरकर, तुषार जाधव यांनी दिली आहे. 

स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षाप्रमाणेच दुसऱ्या वर्षी ही स्पर्धकांचा मोठा सहभाग मिळाला. सकाळी ९ वा. मुंबईनाका हॉटेल संदिप जवळील बॉक्स पार्क(Cricket Matche) येथील मैदानावर ही स्पर्धा रंगणार असून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नामवंत १६ संघांचा सहभाग राहणार आहे. त्यात लॉजिक्यू टेक्नॉलॉजी, देव स्पेस आयटी, रेस्क्यूमोड सर्व्हिसेस, इएसडीएस सॉफ्टवेअर, कोसो लिमिटेड, इल्युमिनिस टेक्नॉलॉजी, नेटविन सॉफ्टवेअर प्रा. लि, इन्फो रायटर, फॉक्स कंट्रोल,  मॉन्टेक्स फायबर, सक्सेस सोलुशन, सुंदरम् फायनान्स आयटी विभाग, सतीश एंटरप्राजेस आदी संघांचा समावेश आहे. 

तसेच विजेत्या संघातील खेळाडूला मॅन ऑफ दी मॅच अवॉर्ड ही देण्यात येणार आहे, सर्व संघांनी मैदानावर वेळेत उपस्थित राहावे असे आवाहन स्पर्धेचे संयोजक योगेश सोनिस, अविनाश नेरकर, तुषार जाधव यांनी केले आहे. या स्पर्धेचे प्रायोजक आकार ग्रुप, ऑसम इव्हेंट आणि नवल एलआयसी, विधेय फुड्स तर माध्यम प्रायोजक नाशिक फास्ट आहे.