सर्वात वर

‘सांग तू आहेस का’ मालिकेची उत्सुकता

बातमीच्या वर

सिद्धार्थ चांदेकरशिवानी रांगोळेसानिया चौधरी प्रमुख भूमिकेत

मुंबई-लव्हस्टोरी आणि हॉरर या दोन्ही जॉनरचा अनोखा मिलाफ असलेली नवी मालिका ‘सांग तू आहेस का’ स्टार प्रवाहावर ७ डिसेंबरपासून रात्री १० वाजता रसिकांच्या भेटीला येत आहे.सिद्धार्थ चांदेकर, शिवानी रांगोळे आणि सानिया चौधरी या मालिकेत मुख्य भूमिकेत असणार आहेत.सध्या या मालिकेच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असं म्हणतात. ‘सांग तू आहेस का’ मालिकेच्या निमित्ताने अशीच एक अनोखी प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे.या मालिकेचे निर्माते विद्याधर पाठारे असून दिपक नलावडे या मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत.

या मालिकेचं वेगळेपण सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘एखादी गोष्ट रसिकांना खिळवून ठेवते त्यांची उत्कंठा वाढवते असं ऐकलं की ती गोष्ट सांगायला अजून हुरुप येतो. सांग तू आहेस का अशीच मालिका आहे. त्याचं कथानक अनेक प्रश्न पडत पुढे पुढे सरकणारं आहे. लव्हस्टोरी आणि त्यात गूढ असा या मालिकेचा बाज असल्यामुळे पुढे काय उलगडेल याची हुरहुर सतत मनाला लागून राहिल.’

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली