सर्वात वर

दहिवडे

आंबट गोड दहिवडे (Dahiwade)सगळ्यांनाच खूप आवडतात. उडीद डाळीने आपल्याला भरपूर कार्बोहाइट्रेस आणि प्रोटिन्स मिळतात 

शीतल पराग जोशी 

साहित्य : 2 वाट्या उडीदडाळ, 1/2 लिटर दही,5 हिरव्या मिरच्या, 1 इंच आले, 5 लसून पाकळ्या, अर्धी वाटी चिंच, चिंचेच्या तिप्पट गूळ, 8 खजूर (बिया काढलेले), जिरा पावडर, थोडा हिंग, हळद, किंचित सोडा,तिखट, मीठ, तेल, साखर

कृती :आदल्या दिवशी उडीद डाळ धुवून पाण्यात भिजत घालावी. दुसया दिवशी त्यातील पाणी काढून टाकावे. डाळ मिक्सरवर थोडे पाणी घालून जाडसर वाटावी. जास्त पाणी घालू नये.आले,लसूण, मिरची पेस्ट करावी. ती पेस्ट ह्या डाळीच्या मिश्रणात घालून, मीठ टाकावे. किंचित हळद, हिंग, सोडा घालायचा. कोथिंबीर घालून  चांगले पीठ कालवून ठेऊन द्यावे.  नंतर दह्यात साखर, मीठ, मिरची पेस्ट , जिरे पावडर आणि थोडी कोथिंबीर आणि पाणी घालून हे दही सारखे करूनफ्रिजमध्ये ठेवून द्यावे.

चिंच, खजूर, गूळ, मीठ एकत्र शिजवून थंड करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. नंतर हे गाळून घ्यावे. किंवा तुम्ही  रेडिमेड इमली चटणी पण वापरू शकतात. कढईत तेल गरम करण्यास ठेवून प्लास्टिक पेपरवर वडे थापून ते छान गुलाबी रंगावर तळून घ्यावेत. गॅस मंद ठेवावा. नंतर वडे  एका भांड्यात पाणी घेऊन त्यात सोडावे.५ मिनिटांनी वडे हाताने दाबून वड्यातील पाणी काढून टाकावे. सर्व्ह करताना एका डिशमध्ये 2 वडे घेऊन त्यावर गारेगार दही, इमली चटणी घालून त्यावर जिरा पावडर आणि थोडे तिखट भुरभुरावे. आणि दहीवडे (Dahiwade) सर्व्ह करावे

Shital-Parag-Joshi-min
शीतल पराग जोशी 

संपर्क-९४२३९७०३३२