सर्वात वर

कोरोनामुळे मायलेकींचा मृत्यू ; मुली पाठोपाठ आईचे ही निधन : नाशकात सर्वत्र हळहळ

नाशिक- कोरोनाचा (Corona) घट्ट विळखा नाशिकला बसला आहे.दररोज हजारो रुग्ण वाढता आहेत.तर अनेकांना आपला जीव गमवावा लागत असल्याच्या बातम्या सातत्याने कानावर येत आहेत.नाशकात कोरोनामुळे(Corona) मायलेकीला आपला जीव गमवावा लागल्याची घटना घडली असून या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

नाशिकमधील प्रसिद्ध कवियत्री प्रा.ज्योती संकपाळ ( वय ६२ वर्ष ) व त्यांची मोठी मुलगी शिक्षिका काश्मिरा सागर घोडके ( वय ४१ ) यांचे कोरोनामुळे निधन झाले. पाहिल्या दिवशी लेकीचे तर दुसऱ्या दिवशी आईचे निधन झाले.अवघ्या एकाच दिवसात निधन झाले.माय-लेकींच्या कोरोनाने झालेल्या मृत्यू मुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. 

प्रा.ज्योती संकपाळ या माजी सैनिक व मंत्रालयातील अधिकारी स्व. शिरीष संकपाळ यांच्या पत्नी होत्या ,त्यांनी 30 वर्ष जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये उत्तम शिक्षिका म्हणून  मोलाचे कार्य केले होते , त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीत त्यांना शासनाने आदर्श  शिक्षिका या पुरस्काराने सन्मानित केले होते , त्यांच्या विविध सामाजिक कारकिर्दीला व  कवितांना अनेक सामजिक  पुरस्कार मिळाले होते , नुकतेच काही महिन्यांपूर्वी मुंबई साहित्य परिषदेच्या वतीने त्यांच्या कवितांना गौरविण्यात आले आले होते , अश्या  सर्वसुपरीचित कवीयत्रीचे  दिनांक १८ एप्रिल २०२१ रोजी व त्यांची मुलगी कॅंब्रिज इंग्रजी माध्यमातील शिक्षिका काश्मिरा  घोडके यांचे १७ एप्रिल २०२१ रोजी एका रात्रीच्या फरकाने निधन झाले. त्यांच्या पश्चात कन्या शिक्षिका मोनिका परमार,अभिनेत्री, निवेदिका नयन जयप्रकाश ,जावई व नातवंडे असा परिवार आहे .