सर्वात वर

नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येत घट : आज कोरोनाचे ८९ तर शहरात १६ नवे रुग्ण

मागील २४ तासात : जिल्ह्यात १०४ कोरोना मुक्त : ३५५ कोरोनाचे संशयित : रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ %

नाशिक – (Corona Update)  आज नाशिक जिल्ह्यातील रुग्ण संख्येत मोठ्याप्रमाणात घट दिसून आली आहे. नाशिक जिल्ह्यात आज ८९ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.तर नाशिक शहरात अनेक महिन्यानंतर रुग्णसंख्येमध्ये कमालीची घट होऊन नव्या रुग्णांची संख्या १६ झाली आहे.तर जिल्ह्यात आज १०४ जण कोरोना मुक्त झाले.आज जिल्ह्यात कोरोनामुळे ३ जणांचा मृत्यू झाला.मात्र १९९७ जणांचे कोरोनाचे अहवाल येणे प्रतीक्षेत आहे.  

जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी आज ९७.५३ % झाली आहे.आज जवळपास ३५५ संशयित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले असून नाशिक जिल्ह्यात आज कोरोनामुळे आज जिल्ह्यात एकूण ३ जणांचा मृत्यू झाला.आज ग्रामीण भागात ०१ जणांचे मृत्यू झाले आहे.तर नाशिक शहरात ०२ ,मालेगाव महापालिका हद्दीत ० रुग्णाचा तर नाशिक बाहेरील ० रुग्णाचा मृत्यू झाला आहे. 

सायंकाळी आलेल्या अहवालात आज नाशिक शहरात १६ तर ग्रामीण भागात ७०मालेगाव मनपा विभागात ०३ तर बाह्य ०० अशा नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरात हा रेट ९७.९९ झाला टक्के आहे.सद्य स्थितीत जिल्ह्यात एकूण १४२८ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून शहरात एकूण ६५१जण उपचार घेत आहेत.जिल्ह्यात कोरोनाचे एकूण १९९७ अहवाल येणे प्रगतीपथावर आहे.अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालायाचे नोडल अधिकारी डॉ.अनंत पवार यांनी दिली. 
(Corona Update)  

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी (Corona Update)  – नाशिक ग्रामीण मधे ९६.८५ %,नाशिक शहरात ९७.९९ %, मालेगाव मध्ये ९६.६९ % तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९७.५८ %आहे.तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९७.५३ %इतके आहे.

(Corona Update) 
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- ३

नाशिक महानगरपालिका- ०२

मालेगाव महानगरपालिका-००

नाशिक ग्रामीण-०१

जिल्हा बाह्य-००

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – ८४८६

नाशिक शहरात एकूण मृत्यू – ३९३४

Corona Update – नाशिक जिल्ह्यात रुग्णालयात दाखल झालेले कोरोना संशयित(सायंकाळी ०६:३०वा पर्यंत)

१) जिल्हा रुग्णालय नाशिक – 

२) नाशिक मनपा रुग्णालये, डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – ३२४

३)डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय महाविद्यालय,नाशिक डी. सी. एच. सी. / सी.सी.सी- 

४)मनपा मालेगाव रुग्णालये ,डी. सी. एच. सी. / सी.सी.सी./गृह विलगीकरण – १२

५)नाशिक ग्रामीण डी.सी.एच.. / सी.सी.सी./गृह विलगीकरण –१५

जिल्ह्यातील कोरोनाचे एकूण प्रलंबित अहवाल  –  १९९७

नाशिक जिल्हा ,शहरात कोणकोणत्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले जाणून घ्या      

(कृपया खालील लिंक वर क्लीक करा)