सर्वात वर

उपमुख्यमंत्री अजित पवार रुग्णालयात दाखल

बातमीच्या वर

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार हे दोन दिवसापूर्वी होम क्वारंटाइन झाले होते. त्यांना थकवा व अंगात कणकण जाणवू लागल्याने त्यांची कोरोना टेस्ट केली असता ती पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्या नुसार अजित पवारांना मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

यापूर्वीही महाआघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच देशातील महत्त्वाच्या राजकीय मंडळींपासून अधिकाऱ्यांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते. 

अजित पवारांची लॉकडाऊनच्या काळात मंत्रालयात नियमित उपस्थिती असायची.त्यावेळी अनेक बैठका ते घेत असत करोनाच्या अनुषंगाने ते सर्व प्रकारची काळजी घेत होते.अलीकडेच त्यांनी अतिवृष्टीग्रस्त परिसराचा दौरा केला होता. तो दौरा करून परतल्यानंतर त्यांना थकवा जाणवत होता.त्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले आहेत.

माझी प्रकृती उत्तम, काळजीचे कारण नाही- उपमुख्यमंत्री अजित पवार         

माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिकांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या  संदेशाद्वारे कळविले आहे.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली