सर्वात वर

एसीपी दर्जाच्या महिलाअधिकाऱ्या मार्फत धनंजय मुंडे प्रकरणाची चौकशी करावी – शरद पवार

आरोपांमधील सत्यता समोर येत नाही,तोपर्यंत धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नाही – शरद पवार 

मुंबई – धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावरील आरोपा विषयी आम्ही सखोल माहिती घेतली असून काल हेआरोप करणाऱ्या व्यक्तीविषयी इतर काही गोष्टी पुढे आल्या आहेत.त्यामुळे तूर्त तरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याचा विषय नसून आता हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे.त्यामुळे संपूर्ण पोलीस चौकशीनंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल. तसेच एसपी दर्जाच्या महिला अधिकाऱ्या मार्फत या प्रकरणाचा चौकशी करावी.असे वक्तव्य पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना केले. 

बलात्काराच्या आरोप आणि विवाहबाह्य संबंधाची धनंजय मुंडे यांनी स्वतःच दिलेली कबुली,यामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला असून विरोधी पक्षांकडून वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान काल या प्रकरणाला वेगळं वळण मिळाल्याचं पाहायला मिळालं.मुंडेंवर आरोप केलेल्या महिलेबाबत भाजपाचे माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी खळबळजनक दावा केला आहे.हेगडे हे फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.त्यानंतर या महिलेने ब्लॅकमेल केल्याचा दावा आणखी दोघांनी केला आहे.या मनसेचे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही आपल्याला या महिलेने दूरध्वनी केले असा आरोप केला आहे. या दोन नेत्यांव्यतिरिक्त जेट एअरवेजच्या एका माजी अधिकाऱ्याने महिलेबाबत अशीच तक्रार नोंदवली असल्याचे समजते आहे. 

या सर्व प्रकरणामुळे मात्र धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला असून संपूर्ण पोलीस चौकशी झाल्यानंतरच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं पक्षाच्या बैठकीत ठरलं असल्याची माहिती शरद पवार यांनी  स्पष्ट केले.