सर्वात वर

“रक्तदान करा” मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांचे नागरीकांना आवाहन

नाशिक – नाशिक जिल्ह्यामध्ये पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी जनतेला रक्तदान(Donate Blood) विषयी आवाहन करण्यात आले होते त्याला प्रतिसाद म्हणून जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये सुट्टीचा दिवस असून सुद्धा ऐच्छिक रक्तदाते रक्तदान (Donate Blood) करण्यासाठी स्वतःहून पुढे येत आहेत.असेच एक उदाहरण जिल्हा रुग्णालयात बघाच मिळाले ऐच्छिक रक्तदाते श्री विद्याधर पांडुरंग शेणॉय यांनी आज जिल्हा रुग्णालयाच्या रक्तपेढीमध्ये येऊन रक्तदान केले. 

साथीच्या काळात अनेक वेळेला रक्त पुरवठा हा कमी होतो अशावेळी समाजाची गरज लक्षात घेऊन काही रक्तदाते स्वतःहून रक्तदान करतात त्यातील हे विद्याधर शेनोय स्वतःहून आज रक्त द्यायला जिल्हा रुग्णालयात आले सहज चर्चा करताना लक्षात आले की अत्यंत मनःपूर्वक विचार करून ही व्यक्ती सुट्टीच्या दिवशी सुद्धा रक्तदान करायला आली मी वर्तमान पत्रात रक्ताचा तुटवडा आहे हे वाचून आलो आहे आणि उद्या सुद्धा मी एखाद दोन जणांना नक्की घेऊन येईल तसे ते रक्तमित्र तथा जनसंपर्क अधिकारी गौरव शितोळे यांच्याशी बोलताना व्यक्त केले. 

याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सामान्य प्रशासन श्री आनंद पिंगळे सर यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले जनतेला आवाहन करण्यात येते की ऐच्छिक रक्तदात्यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढी मध्ये जाऊन रक्तदान (Donate Blood) करत राहावे कारण या रक्ताचा उपयोग जिल्हा रुग्णालयात गरजू व गरीब रुग्णांना मोफत करण्यात येतो आपणाला सर्वांना जिल्हा रुग्णालय रक्तपेढी विभाग आवाहन करण्यात येते की आपण सर्वांनी आपल्या वेळेनुसार पण आठवणीने रक्तदान (Blood Donation)करावे कारण आता सध्या खूप गरज आहे असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर, यांनी केले आहे.