सर्वात वर

९४ व्या अ.भा.मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ अनिल अवचट यांची निवड करावी

झेन फॉऊडेशनची मागणी (94th Marathi Sahitya Samelan) 

नाशिक – नाशिक मध्ये होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. अनिल अवचट (Dr. Anil Avchat) यांची निवड करण्यात यावी या मागणीचे निवेदन संमेलनाचे संयोजक जयप्रकाश जातेगावकर यांच्या कडे झेन फॉऊडेशन यांच्या वतीने देण्यात आले.डॉ. अनिल अवचट (Dr. Anil Avchat) यांना संधी दिल्यास साहित्य संमेलनाचा मान उचावेल आणि संमेलन लोकाभिमुख होईल असे ही निवेदनात म्हटले आहे.

महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले – पाटील यांना लिहिलेल्या निवेदनावर गिरीश उगले – पाटील, चंद्रशेखर महानुभाव, जितेंद्र भावे, स्नेहल सावळे, विकास पाटील, सुमित शर्मा, एकनाथ साळवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.प्रसंगी लोकहितवादी मंडळाचे सचिव सुभाष पाटील, संयोजन समितीचे डॉ. शंकर बोऱ्हाडे, संजय करंजकर उपस्थित होते

संमेलनाच्या तयारीला वेग आला असून नाशिक शहरातील विविध मान्यवरांच्या भेटी गाठी संयोजन समितीचे सदस्य घेत आहे. लवकरच साहित्य संमेलनाचे मध्यवर्ती कार्यालय सुरु होण्याची माहिती संयोजकांच्या वतीने देण्यात आली आहे.