सर्वात वर

ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit)-(आहार मालिका क्र – १९)

डॉ. राहुल रमेश चौधरी 

विदेशी फळफळावळ मध्ये आज आपण ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit) विषयी माहीती पाहणार आहोत. Hylacereus undatus-leiking thambaya-red pitahaya –strawberry pear -brahmakamal   अश्या अनेक नावांनी ओळखल जाणारे हे फळ   Vietnam,thialand,south china,Australia,Bangladesh या देशांमध्ये मिळते.

कमी पाणी आणि उष्ण तापमान लागत असल्याने नाशिक जिल्ह्यात  Malegaon chandawad येथे प्रायोगिक तत्वावर ड्रॅगन फ्रूटच्या (Dragon fruit) लागवडीचे प्रयोग सुरु आहेत. भारतात ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit) Karnataka-andhrapradesh,telangana,aasaam,gujrat,Haryana या राज्यांमध्ये उत्पादन होते.किवी फळाप्रमाणेच या फळाच्या आतील गर चमच्याने काढून खाता येतो.

लाल रंगाचे हे ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit) यावर अननसाप्रमाणे काटे असणारे व मोसंबीच्या फळाच्या आकाराएवढे असून मोठ्या मोठ्या मॉल मध्ये मन आकर्षित करून घेते.याचे रोप हे cactus वर्गात मोडते.याचे फूल रात्री उमलत असल्याने त्यास queen of neight  म्हणतात.अश्या या फळाची आपण आज माहिती घेवूयात. 

ड्रॅगन फ्रूट (Dragon fruit)  विषयी आज जाणून घेऊ या 

१. हे फळ मधुमेह नियंत्रक असून ह्रद्यासाठी बलकारक आहे.

२. प्रती १०० ग्रॅम फळापासून energy 60 calories एवढी मिळते.यात कॅल्शियम ८ ग्रॅम,प्रथिने २ ग्रॅम पर्यंत मिळतात.त्याचप्रमाणे शर्करा,कर्बोदके मिळत असून तंतुमय पदार्थांचे प्रमाण १ ग्रॅम एवढे नगण्य आहे.

३. फळाच्या बीयापासून तेल काढतात त्यात शरीरास आवश्यक omega 3 व omega E मिळतात.तसेच myristic acid,palmitic acid,stearic acid,palmitoleic acid,oleic acid,linolenic acid हे घटक सापडतात. 

४.हे फळ vitamin C,B1.B2,B3, iron,calcium याने समृध्द आहे.त्यामुळे या घटकांची कमतरता असल्यास हे फळ खाणास योग्य आहे.

५.या फळाच्या नियमीत वापराने वजन नियंत्रणात राहते व अतिरिक्त कोलेस्टेरॉल कमी करून उपयुक्त कोलेस्टेरॉल चे प्रमाण वाढवण्यास मदत करते परिणामी ह्रद्यास यापासून बळ मिळते 

६. तंतुमय पदार्थ नगण्य असले तरी याप्रमाणाने देखील रक्त शर्करा नियंत्रणात राहते.

७.फळात अतिशय योग्य प्रमाणात antioxidants असल्याने त्वचा ही व्यवस्थित राहण्यास मदत होते.

८.या फळातील लायकोपीन घटकाने प्रोस्टेट ग्रंथीच्या कॅन्सर चा धोका कमी होण्यास मदत होते

९.आधुनिक संशोधनानुसार यातील कॅल्शिअम च्या समृध्द प्रमाणामुळे संधिवाताच्या रुगणांना मदत मिळते.

१०.मॉडर्न कॉस्मेटिक्स मध्ये चेहऱ्यावरील पुटकुळ्या करीता या फळाची पेस्ट करून लावतात व धुवून टाकल्यास चांगले परिणाम मिळतात,तसेच या फळाचा गर चेहऱ्याला लावल्यास त्वचा सुंदर होते,हे फळ चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते व हे उत्कृष्ट antiaging आहे.

११.या ने केस योग्य मऊ व संपन्न राहतात.

१२.आयुर्वेदात सुरु असलेल्या संशोधना नुसार हे फळ कफघ्न,मेदोघ्न,प्रमेहघ्न,ह्रद्य व केश्य असल्याचे सिध्द झाले आहे.

सावधान

-फळ हे दूधासह वापरू नये
-फळातील फ्रुक्टोज च्या अतिप्रमाणाने याचा अतिवापर टाळावा.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ. राहुल रमेश चौधरी 

संपर्क- औदुंबर आयुर्वेद चिकित्सालय
मोबाईल -९०९६११५९३०