सर्वात वर

कानाचे विकार (Ear Disorders) व आयुर्वेद

बातमीच्या वर

आपण जे ऎकतो तेच करतो,त्याप्रमाणे सगळ ठरवतो आणि त्याप्रमाणे बोलतो देखिल पण मग जे ऎकतो ते आपण आपल्या श्रवणेंद्रियाने ऎकतो म्हणजेच आपल्या कानांनी ऎकतो,आपल्या शरीरात असलेल्या पंचेंद्रियांचे खूप महत्व आहे.प्रत्येक इंद्रिय शरिरात घडणाऱ्या घडामोडीत मोलाचे योगदान देते.असेच एक इंद्रिय म्हणजे श्रवणेंद्रिय.याच श्रवणेंद्रिय म्हणजेच कानाच्या आजारा (Ear Disorders) विषयी आपण आज पाहणार आहोत.

१.कानाचे आजार (Ear Disorders) कशामुळे होतात?

गार वारे,थंडी किंवा पावसात सतत भिजणे

पाण्यामध्ये खूप काळा डुंबणे/पोहणे

कानास मार लागणे

खूप उन्हात फिरणे

राग,शोक,चिंता अतिप्रमाणात करणे

कफ वाढवणारे थंड पदार्थ अतिप्रमाणात खाणे

खूप तिखट,उष्ण,तीक्ष्ण पदार्थांचे मोठ्या प्रमाणात सेवन करणे

तापामध्ये,सर्दि,पडसे अतिशय तीव्र औषधे घेण

Antibiotics चे अकारण सेवन करणे

टॉन्सिल च्या गाठी वाढणे

कानात कान खाजवण्यासाठी काडी,पिन घालून खाजवणे

कानात पाणी जाणे

कानात पाणी गेलेले असतान सुध्दा कानात तेल टाकणे

अति बडबड,अतिविचार करणे

खूप मोठ्याने बोलणे

अकाली व मोठ्या संख्येने दात काढणे

दात काढण्याकरिता भूल दिली जाणे

खूप थंड,वात दोष वाढवणार आहार घेणे

जंत  मोठ्या प्रमाणावर होणे

बाळंतपणात योग्य ते नियम न पाळणे

काही आनुषंगिक आजार उदा.उच्च रक्तदाबाची औषधेया कारणांमुळे कानाचे आजार होतात.


२.कानाच्या आजाराची (Ear Disorders) कोणती लक्षणे दिसतात?


कान वाहणे(कान ओलसर होणे)

कानातून पू वाहणे

कानातून दुर्गंधी येणे

कानाच्या आतील सूक्ष्म हाडांना इजा होणे

कान सतत दुखणेगार वारे लागले असता दुखणे

कान कोरडे झाले असता दुखणे

कानात पू झाला असता दुखणे

अजिबात ऎकू न येणे

ठराविक वेळी ऎकू न येणे

ठराविक आवाज ऎकू न येणे

कानातील मळ कोरडा होवून खाज सूटणे

कानातील मळ वाढून खाज सुटणे

कानात वेगवेगळे आवाज येवून कान ठणकणे,रात्रीच्या वेळेस हा आवाज वाढणे

कानाला सूज असणे

कानाचे पडदे खराब होणे कानाच्या दुखाण्याने जबडा उघडता न येणे अशी सर्वसाधारण लक्षणे दिसतात.


३.कानाचे परिक्षण?


रुग्णाला सर्दि.खोकला,ताप,दाढ दुखणे,दात दुखणे,टॉन्सिल वाढणे,सूजणे अश्या वेगवेगळ्या पध्दतीने तपासणी  केली जाते यात घसा ,कानाचे पडदे,कानाच्या हाडांची आतील रचना सूक्ष्म दर्शिकेद्वारे बघितली जाते.कानाची आवाजाची तपासणी केली जाते.voice teste,audiometry,rinne’s test,weber’s test,tuning fork test,internal examination of ear,caloric test, अश्या प्रकारच्या तपासण्या केल्या जातात.

४.आधुनिक शास्त्रात काय उपचार होतात?

आधुनिक शास्त्रात कानाच्या गरजेनुसार शस्त्रक्रिया,वेदनाशाम्क औषधे,antibiotic  असे उपचार केले जातात.


५.आयुर्वेद शास्त्रात कानाकरिता उपचार पध्दती काय?

आयुर्वेद शास्त्रानुसार कान हे वाताचे घर मानले जाते.वाताच्या आजारांकरिता करण्यात येणारे उपचार काना करिता केले जातात.आयुर्वेदात पंचकर्म,औषधे,पथ्य,रसायन चिकित्सा या त्रिसूत्री वर कानाचे उपचार केले जातात.

पंचकर्म-

यात कर्णपूरण,नस्य,रक्तमोक्षण,स्नेहन,स्वेदन,कर्णधावन,कर्णधूपन,वमन ही पंचकर्म केली जातात.


अ)कर्णपूरण म्हणजे काय??

कर्णपूरण हि नस्य या पंचकर्मासारखे एक कर्म आहे,यात औषधी तैल कानामध्ये योग्य प्रमाणात टाकले जाते.कर्णपूरण कोणत्या आजारांकरिता करतात?-कर्णपूरण हे कान दुखणे,कमी ऐकू येणे,डोके दुखणे,मान जखडणे व दुखणे,ह्नुवटी जखडणे व दुखणे अश्या विविध आजारांकरीता कर्णपूरण करतात.

ब)स्नेहन-स्वेदन्

कानात मळ साचलेला असल्यास  कानात औषधी तेल टाकून त्यास औषधी काढ्याची वाफा देवून कानातील मळ सैल करून काढला जातो.

क)कर्णधावन

कान औषधी काढ्याने धुवून काढण्याच्या पध्दतीला कर्णधावन म्हणतात

ड)कर्णधूपन

कानास औषधी नी धूप देवून जंतूनाशक करण्याच्या पध्दतीला कर्णधूपन म्हणतात.याव्यतिरिकत वमन,रक्तमोक्षण, नस्य ही महत्वाची कर्मे देखिल केली जातात.

औषधे

कानाच्या आजारात औषधांचा रोल खूप महत्वाचा आहे.यात सारिवादी वटी,दीपिका तेल,अपामार्ग क्षार तेल,इन्दु वटी,अणु तैल,बिल्व तेल,वसंतकुसुमाकर रस,महालक्ष्मीविलास,सप्तामृत लौह,अभ्रक भस्म,सुवर्णमालिनि रस,सूक्ष्म त्रिफळा,आरोग्य वर्धिनी,महायोगराज गुग्गुळ,पंचामृत लोह गुग्गुळ,लाक्षादी गुग्गुळ,पुनर्नवा मंडूर,आरोग्यवर्धिनी,त्रिफळा गुग्गुळ,ब्राह्मी-जटामांसी वटी ,बिल्व चूर्ण अशी औषधे कानाची हाडे सुधारण्याकरीता,शरीर व्यवस्थित राहण्याकरीता अशी अनेक प्रकारच्या औषधे वापरली जातात.

पथ्य

पथ्या आपण पूर्वीच हेतु मध्ये म्हणजेच कारणांमध्ये पाहिले आहे.तरी काय काळजी घ्यायला हवी हे आपण पाहूयात.

*स्निग्ध पदार्थांचा वापर करावा,रुक्ष-कोरडे पदार्थ टाळावे

*उकळून गार केलेले पाणी प्यावे,गार वारे-खूप ऊन-पाऊस यापासून संरक्षण करावे

*लसून,जिरे,मोहरी,हळद,आले,शेवगा याचा वापर जेवणात वाढवावा

*भूक चांगली लागावी याकरिता प्रयत्न करावा

*थंड व कफ  वाढवणारे पदार्थ टाळावेत.

*कानात सतत कापूस ठेवावा,मफलर गुंडाळून ठेवावे

*मोठ्याने बोलने.कानात काड्या टाकणे टाळावे.

*कानाची आरोग्य अबाधीत राहावे याकरिता प्रयत्न करावे.


***रसायन चिकित्सा

कानाचा त्रास पुन्हा होवू नये याकरीता औषधी तूप,अवलेह याने कायम स्वरूपी त्रास जातो.

Dr-Rahul-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

डॉ.राहुल रमेश चौधरी

संपर्क-9096115930

ई-मेल-[email protected]

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली