सर्वात वर

मी काय मदत करु शकतो याचा विचार झाला पाहिजे-आशुतोष गोखले

बातमीच्या वर

तुला पाहते रे आणि रंग माझा वेगळा या मालिकांमधून एक नविन चेहरा आपल्याला पहायला मिळाला जो एक उत्तम अभिनेता आहे, स्मार्ट तर आहेच आणि तितकाच संवेदनशीलसुद्द्धा आहे. आपाल्याला मिळालेल्या सक्तीच्या सुट्टीमुळे आपण घरी आहोत, आपली काळजी घेतो आहोत. हे सगळं झालं आपल्यापुरतं या पलिकडे जाऊन आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो हि जाणिव ठेऊन समाजाप्रती आपल्या कर्तव्य पुर्तीची विधायक सुरुवात करुन आपल्यापुढे एक उत्तम उदाहरण ठेवत असतानाच अभिनेता आशुतोष गोखले आपल्याला सांगतोय…

स्वरदा कुलकर्णी,नाशिक 

ही सुट्टी लागण्याआधीचे आयुष्य जवळपास १४-१५ तास शूट्मुळे बिझी असायचे. दिवसाचा फ़ार कमी वेळ घरी किंवा घरच्यांसोबत मिळायचा. गंमत असते ना! आपल्याला हे कळत असतं पण वेळ आपल्या हातात नसतो. किंवा काढायचा ठरवला तरी शक्य होत नाही. बरं मालिका सुद्धा इतक्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे कि सुट्टी घेणं तर शक्यच होत नाही. तरीही मला स्वत:ला ब्रेक हवा म्हणुन मी सुट्टी घेऊन कुठेतरी मस्त फ़िरुन यायचं असं ठरवलेलं होतं. तर या लॉक डाऊन मुळे मोठ्ठा ब्रेक मिळाला तोसुद्धा घरच्यांसोबत. आता जवळपास दीड महिना झाले घरी असल्यापासुन जाणवायला लागले कि घरच्यांसोबत असणं माझ्या आयुष्यात किती महत्वाचं आहे.

सुरुवातीला खरंच असं वाटले होते कि बापरे एवढे दिवस घरात कसे जाणार? कारण आपल्याला एक रुटीन फ़ॉलो करायची सवय लागलेली असते. ती मो्डून एका नविन रुटीन कडे जाताना हे ट्रांझिशन जरा अवघड जाते. हळुहळू आपण परिस्थितीशी जुळवून घेऊ लागतो तेव्हा अनेक गोष्टींची नव्याने जाणिव होऊ लागली. आपल्याला जो वेळ मिळाला आहे असा वेळ पुन्हा मिळणं केवळ अशक्य आहे त्यामुळे तुम्हाला आवड जोपासायची आहे, जरुर करा. नविन पदर्थ करुन खायचे आहेत, नक्की करा आणि त्याचा आस्वाद घ्या. वाद्य शिकायचे आहे तर तेही तुम्ही ऑनलाईन शिकु शकता. यातून समाधान नक्की मिळेल. 

मला माझ्या घरच्यांसोबत खुप चांगला वेळ मिळाला आहे. माझे आई, बाबा, बहिण आणि माझा छोटा भाचा हे सगळेच घरी एकत्र आहोत. माझ्या भाच्यासोबत मिळालेला वेळ मी त्याच्यासोबत खुप एन्जॉय करतोय. अनेक वर्षांनी घरात दोन्ही वेळचे एकत्र जेवण करु शकतोय. ही अत्यंत सुखावणारी गोष्ट आहे. प्रत्येकासोबत गप्पा होणं, चेष्टामस्करी होणं यातुन आपल्यातलं बॉडींग वाढतं, हा या सगळ्याकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन आहे.

जवळ जवळ ४ आठवडे होत आले आता. या काळात सगळ्या गोष्टी करुन झाल्या. पुस्तकं वाचणं, लाईव्ह जाणं, वेबसिरिज बघणं, आता मात्र घरी न बसता आपण काहीतरी वेगळं करावं हा विचार माझ्या डोक्यात आला. माझ्या एका पत्रकार मित्राने एक स्टोरी केली जी माझ्या बघण्यात आली. लॉक डाऊनमुळे आपण सगळेजण सुखरुप आहोत, आपापल्या घराच्यांसोबत दोव वेळचं व्यवस्थित खाऊ शकतोय. पण आपल्या आजुबाजुला मात्र असे अनेक लोक आहेत ज्यांना रहायला छप्पर नाहीये, घराच्यांपासून लांब आहेत आणि खाण्यापिण्याची भ्रांत आहे. अश्या लोकांच्या मदतीसाठी काम करणार्‍या अनेक एनजीऒ आहेत. त्यांच्यासोबत काम करता येऊ शकते. मी अश्याच काही पर्यायाच्या शोधात होतो. 

हे सगळं का करावं? सगळ्यात महत्वाचं आपली इतरांना मदत होऊ शकते असं काम करण्याची तयारी असावी. शारिरिक दृष्ट्या फ़िट अर्थात इम्युनिटी चांगली असावी. आपल्यावर कोणी घरात अगदी अवलंबून नाहीये याचा विचार करावा कारण आपल्यामुळे घरात कोणाला त्रास व्हायला नको. यात मी नक्की बसतो याचा अंदाज आल्यावर विचार करुन मी एन जी ऒ ला संपर्क केला. ज्या लोकांपर्यंत अन्न पोहोचण्याची गरज आहे त्या सगळ्यांसाठी अन्न मिळण्याची व्यवस्था झाली मग माझ्यावर ते अन्न रोज त्यांच्यपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवली. गेल्या अनेक दिवसापासुन हे काम मी अत्यंत मनापासुन करतो आहे. 

भारतात विविधता पाहायला मिळते. आपण बघू शकतो अनेक स्तराचे लोक इथं राहतात. त्यामुळे कोणतीही आपत्ती आली तर सगळ्यांनाच त्याचा फ़टका बसत असतो. या परिस्थितीतुन बाहेर यायला अनेक हात पुढे येतात. अश्या परिस्थितीमध्ये आपण एकमेकांना सर्वतोपरी सहकार्य करायला हवे. आपण ज्या समाजात राह्तो त्याच्याप्रती आपल्याला काय मदत करता येईल याचा विचार करायला हवा. आज बाहेर पडतो तेव्हा लक्षात येतं कि प्रत्येक प्रकारच्या मदतीची लोकांना किती गरज आहे. तेव्हा जमेल तेवढे सहकार्य करा, सुरक्षित रहा!

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली