सर्वात वर

सोशली डिस्कनेक्टेड राहून डिजिटली कनेक्टेड राहुया – सायली संजीव

बातमीच्या वर

Entertainment news – लॉक डाऊनमुळे तिला सक्तीची सुट्टी मिळाली तेव्हा ती काय करते आहे. 

“गोरी हो या गौरी है तो शिव की नौरी” हा डायलॉग जिच्यासाठी गाजला ती नाशिकची सायली संजीव. मालिकेपासून सुरु झालेला प्रवास हा मोठ्या पडद्यापर्यंत येऊन ठेपला आहे. नुकतेच तिचे मराठी चित्रपट प्रदर्शित झाले त्यांमुळे गेले अनेक महिने ती कामामुळे व्यस्त होती. लवकरंच तिचं एक गाणे रिलिज होते आहे. आता लॉक डाऊनमुळे तिला सक्तीची सुट्टी मिळाली तेव्हा ती काय करते आहे. 

(स्वरदा कुलकर्णी)

गेले ६-७ महिने माझं सातत्याने काम चालू होतं. प्रचंड बिझी होते. सतत काही ना काही काम चालूच होते. माझा एक सिनेमा नुकताच रिलिज झालाय. ज्याच्या प्रिमियरसाठी माझे आई बाबा मुंबईला आले होते. अश्यातच काहीतरी निमित्त झाले मी धडपडले. त्यानंतर लगेचच हा लॉक डाऊन सुरु झाला. एकदम व्यस्त असणं ते एकदम आरामात असणं असा आयुष्यात झालेला मोठा बदल मी गेल्या काही दिवसापासुन अनुभवते आहे.

कोरोनामुळे जी सुट्टी मिळाली ती माझ्या पथ्यावरच पडली. कारण बाहेरचं अख्खं जग आज थांबलंय. सिनेमा रिलिज झालाय त्यामुळे कामाचं टेन्शन नाहीये. नविन कुठली कामं लगेच सुरु होण्याची शक्यताही नाहीये. या सगळ्या मिळालेल्या वेळात हळू हळू दुखणं बरं होऊ लागलंय. दुखापत झालेली असल्यामुळे मी घरीच आराम करतेय. या सगळ्यात एक महत्वाची गोष्ट मी करते आहे. माझ्या आवडीच्या जुन्या सिरिज बघते आहे. काही वेबसिरिज बघते आहे. ज्यामुळे मला आनंदी राहता येईल, दुखणं विसरायला होईल. 

असं सगळं जरी असलं तरी या सुट्टीमुळे माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे कि आपण कितीही म्हणलो कि मला सुट्टीची गरज आहे, तरी प्रत्यक्षात मात्र २ दिवसापेक्षा जास्त घरी राहुच शकत नाही. इतकी या कामाच्या रूटीनची सवय लागलेली असते. हळू हळू मी घरातल्या घरात कामं करायला सुरुवात केली. स्वयंपाक करायला आवडतो. म्हणुन मी रोज काहीना काही नविन पदार्थ करते आहे. एक वेळचा स्वयंपाक माझ्याकडे असतो ज्यामध्ये मी चमचमीत किंवा आत्तापर्यंत कधी ट्राय केला नसेल असा पदार्थ मी करते. जे आम्हाला तिघांनाही आवडते आहे. मला स्वत:ला गोड पदार्थ खुप आवडतात. त्यामुळे गोडधोड करणं आणि खाणं चालु आहे.

आई बाबा आणि मी हा इतका वेळ अनेक वर्षांनी एकत्र भेटलो आहोत. त्यामुळे एकत्र गप्पा मारणे, एकमेकांची काळजी घेणे यामध्ये मिळालेल्या वेळाचा आनंद घेतोय. तसंच दुपारच्या वेळात आम्ही एकत्र बसुन टीव्ही बघणं असं काहीतरी करत असतो. माझ्या आईला झी मराठी वरच्या जुन्या मालिका खूप आवडतात. मी तिला इंटरनेटवर लाऊन देते. ती तिचं तिचं एन्जॉय करते आहे. ते दोघंही माझ्यासोबत असल्याने मला खुप मोठा आधार वाटतो आहे. माझी मदतही होते आहे. 
संध्याकाळ झाली कि आई बाबा त्यांचे त्यांचे फेरफटका मारतात. मी घरातल्या घरात वेट ट्रेनिंग करते. जेणेकरून फ़िटनेसची जी सवय शरिराला लागली आहे त्यामध्ये काही ना काही हालचाली होत रहायला हव्यात. या लॉक डाऊनच्या काळात जसं मन:स्वास्थ्य टिकणे गरजेचे आहे तसेच शरिरस्वास्थ्य टिकवणे हि आपली जबाबदारी आहे. सो, एकदम लोड घेऊन काही तरी करण्यपेक्षा जे जमेल जे गरजेचे असेल तेवढे माझे मी करते आहे.

आपलं कसं होतं ना आपण करियर, काम या सगळ्याच्या मागे धावताना आपल्या व्यक्तींचा सहवास कमी होत असतो, एकमेकांपासून दुरावलेले असतो. आपण तेव्हाही एकमेकांशी फोन च्या माध्यमातूनच संपर्कात असतो. त्यामुळे आत्ता या परिस्थितीत घरी आहोत आपल्या मित्र मैत्रिणींना भेटु शकत नाहीये याचं फार वाईट वाटून नका घेऊ. प्रत्यक्ष भेटायला वेळ नसायचा तेव्हा जसं आपण फोन वर व्हिडियो कॉल वरुन एकमेकांशी बोलायचो तसंच आताही करु शकतोय याचा विचार करुयात. सोशली डिस्कनेक्टेड राहून डिजिटली कनेक्टेड राहुयात. एकमेकांची काळजी घेऊयात.

बातमीच्या मध्ये
बातमीच्या खाली