सर्वात वर

‘अपेक्षा ‘

डाॅ स्वाती गानू टोकेकर 

ब-याच घरात लग्न होऊन नवीन सून घरात आली की काही दिवस बरे जातात. नव्याची नवलाई असते.चार दिवस आनंदाचे असतात. पण हळूहळू अपेक्षांचं शस्त्र डोकं वर काढतं.सुनेने सगळ्यांच्या आधी उठावं,चहा करून द्यावा, टेबलवर गरमागरम नाश्ता सर्व्ह करावा.लवकर आंघोळ करून पूजा करावी नाहीतर घरातील ज्येष्ठांना पूजेची तयारी करून द्यावी. शाळा ,काॅलेज, ऑफिसला जाणा-यांचे डबे हातात द्यावेत.अर्थात हिंदी पिक्चरमधील आदर्श सुनेसारखं वागावं .घरातली कामं, जबाबदा-या तिने पार पाडाव्या अशी अपेक्षा असते.आणि तसे घडले नाही की मग अपेक्षाभंग होतो..मन कुरकुर करायला लागतं.ती आलेली नसते तेव्हाही घर चालत असतं,कामं होतच असतात. सगळं सुरळीत होत असतं.मात्र ती आली पण अपेक्षापूर्ती होत नाही म्हणून मनःशांतीही संपते.खरं म्हणजे जेव्हा अपेक्षा संपतात तेव्हा शांती मिळायला सुरुवात होते. निराशा उरत नाही. 

अपेक्षांची एक मजा असते.त्या जेव्हा स्वतःकडून केल्य जातात आणि पूर्ण होतात तेव्हा आनंद होतो सवतःबद्दल अभिमान वाटतो आणि पूर्ण होत नाहीत तेव्हा दुःख होतं, निराशा येते .पण अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही याचं खापर आपण परिस्थितीवर इतरांवर फोडत असतो. वास्तविक ‘अपेक्षा ‘हे प्रत्येक व्यक्तीच्या समाधानासाठी, प्रगतीसाठी, आनंदासाठी  स्वतःच्या क्षमता तपासून पाहण्याचं साधन असतं.पण स्वतःकडूनही अतिअपेक्षा केल्या की त्या नेहमीच पूर्ण होतात असं नाही. अभ्यास करताना, स्पर्धांमध्ये, खेळात किंवा ठराविक वेळेत एखादं काम,प्रकल्प, प्रयोग पूर्ण करताना शंभर टक्के अपेक्षांचं उद्दिष्ट असायला हरकत नाही पण रोजच्या जीवनात अतिअपेक्षा दुःख देतात.रिझनेबल एकसेप्टेशन्स तुम्हाला समाधानी ठेवतात. मुलांचा अभ्यास, त्यांची शारीरिक, मानसिक वाढ,प्रगती याबाबत आपल्या मुलाच्या कुवतीनुसारच अपेक्षा ठेवतात.ऑफिसमधल्या ,करियरमधल्या प्रगतीबाबत, घरच्या कामांबाबत अपेक्षा करताना सगळयांनीच वास्तवाचं भान ठेवायला हवं.

अपेक्षांबद्दल नेहमीच असं म्हटलं जातं की तुमच्य अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीतर लोकांना ब्लेम करु नका.आपण अवास्तव अपेक्षा करतो म्हणून निराश होतो,दुःखी होतो. यासाठीच हा विचार की 

Except more from yourself than from others 

Because expectations from others hurt  a lot.

While expectations from yourself inspire a lot.

That’s life.

हे नीट समजून घ्यायला हवं.हा सकारात्मक विचार अपेक्षा करताना आपल्याला योग्य मार्गदर्शन,मार्गाने घेऊन जातो. अपेक्षा आणि अटॅचमेन्ट यातलं नातं खूप घट्ट आहे. अटॅचमेंट असली की एक्सपेक्टेशन्स वाढतात.यासाठी थोडं सजग राहू या.

Keep your expectations high on achievements and low on people. 

आपण जर अपेक्षांना थोडं मुक्त केलं तर आपण गोष्टींचा आनंद घेऊ शकतो.जसं आपण स्वतः स्वतःच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करतो आणि पूर्ण नाही झाल्या तर स्वतःला वेळ देतो.मनाला धीर देतो.अगदी तसाच विचार समोरच्याकडून अपेक्षा करताना व्हायला हवा. काम करताना,करून घेताना आशा जरूर असावी पण अवास्तव अपेक्षा करू नये.मी काही केलं म्हणून त्याच्या बदल्यात मला काय परत मिळेल अशी अपेक्षा करणं हे बहुतेकवेळेला धोकादायक ठरतं.भगवदगीतेतही हेच म्हटलंय की ‘ कर्म किए जा फलकी इच्छा मत कर ऐ इन्सान .अपेक्षा आणि वास्तव यातलं अंतर यामुळेच आपण दुःखी होतो. म्हणून एकतर अपेक्षा कमी ठेवून वस्तुस्थिती स्वीकारावी किंवा जास्त अपेक्षा ठेवावी आणि त्या अपेक्षा पूर्ण करण्याची हिंमत ठेवावी.

आईवडिलांची मुलांकडून, पतीची पत्नीकडून,सासूसास-यांची सुनेकडून,बायकोची नव-याकडून,बाॅसची एम्प्लाॅयीकडून,प्रेमी रुग्णांची एकमेकांकडून अपेक्षा असतातच. कुटुंबात विशेषतः नात्यांमध्ये अपेक्षा करणं,त्या पूर्ण न होणं,त्यातून गैरसमज, वाद,कटूता,नात्यातलं अंतर वाढत जाणं घडतं म्हणूनच दुस-यांकडून कमीत कमी अपेक्षा ठेवाव्या. असं कोणी विचारलं की तुम्हाला कोणी हर्ट केलं तर त्याचं उत्तर ‘माझ्या स्वतःच्या अपेक्षा ‘हे उत्तर खूप काही सांगून जातं. शेवटी आपण हे लक्षात ठेवू या.

Expecting ends in tears

And accepting make you cheers.

Swati-Tokekar
डाॅ स्वाती गानू टोकेकर