सर्वात वर
AC Ad

‘कागर’ साठी शुभंकर तावडेला बेस्ट डेब्यु फिल्मफेअर पुरस्कार

बातमीच्या वर

मुंबई – कागर  (Kagar) चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाची घोडदौड सुरु करणाऱ्या शुभंकर तावडेला ‘कागर’ मधल्या अभिनयासाठी  फिल्मफेअरने(Filmfare) पुरस्कार देऊन गौरविले आहे.२०१९ ला कागर चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात शुभंकर तावडे आणि रिंकू राजगुरू यांची प्रमुख भूमिका होती. 

यंदाचा ‘बेस्ट डेब्यु फिल्मफेअर’ (Filmfare)पुरस्कार शुभंकर तावडेला मिळाला आहे. आपल्या पहिल्या-वहिल्या फिल्मफेअर पुरस्काराने भारावलेला शुभंकर तावडे प्रतिक्रिया देताना म्हणाला,”फिल्मफेअर पुरस्काराची ‘ब्लॅक लेडी’ मिळवणं, हे खुपच अभिमानाचं आणि स्वप्नवत आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करणा-या प्रत्येक अभिनेत्याचे हे स्वप्न असतं. आज हे स्वप्न सत्यात उतरताना अतिशय आनंद होतोय.”

शुभंकर पूढे म्हणतो, “मला कागरचे (Kagar) दिग्दर्शक मकरंद माने ह्यांचे विशेष आभार मानावेसे वाटत आहेत. कारण, माझ्यासारख्या नवोदित अभिनेत्यामध्ये त्यांनी कागरमधला हिरो पाहिला. मी सिनेमातला हिरो बनू शकतो. हा विश्वास त्यांनी माझ्यावर ठेवला. माझ्या वडिलांचे (अभिनेता सुनील तावडे) मार्गदर्शनही मला सातत्याने मिळत गेल्याने मी आजवर इथवर पोहोचलो. सर्वात महत्वाचे म्हणजे, मला हा पुरस्कार मिळण्यात प्रेक्षकांचा मोठ वाटा आहे. त्यामुळे त्यांचेही आभार.”  असे हि  शुभंकर  ने सांगितले   

बातमीच्या मध्ये
Ac square