सर्वात वर

नाशिकच्या जिल्ह्या न्यायालयातील इमारतीला आग

अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल 

नाशिक – नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या एका इमारतीस आज (दि.१) रोजी दुपारी २:४० च्या सुमारास आग लागली(Fire in Nashik District Court Building) असून या आगीमुळे न्यायालयाच्या परिसरात धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत. या इमारती मध्ये स्टेशनरी रूमला हि आग लागल्याचे बोलले जात आहे. 

या बाबत अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आज दुपारी २:४०च्या सुमारास जिल्ह्या न्यायालयातील या इमारतीत अचानक आग लागण्याची घटना लक्षात आल्यानंतर एकाच खळबळ उडाली न्यायालयात आलेल्या नागरीक आणि वकिलांनी तो परिसर तातडीने खाली केला. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच शिंगाडा तलाव अग्निशमन केंद्रातून १ बंब आणि पंचवटी अग्निशमन केंद्रातून एक बंब घटना स्थळी दाखल झाला असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहै जिल्ह्या न्यायालयातील या इमारतीला आग (Fire in Nashik District Court Building) कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही.