सर्वात वर

‘फ्लॉवर पार्क’ प्रकल्पांमुळे नाशिकच्या पर्यटन वाढीस फायदा – छगन भुजबळ

नाशिक ‘फ्लॉवर पार्क’(Flower Park)चे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते उद्घाटन

नाशिक जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या दृष्टीने अनेक प्रकल्प साकारले आहे.त्याच बरोबर नाशिकमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.त्यामुळे पर्यटक देवदर्शना सह निसर्गदर्शना साठी नाशिकला येणे पसंद करतात निसर्गाचे वरदान लाभलेल्या नाशिकमध्ये आता ‘फ्लॉवर पार्क’ (Flower Park)सारख्या पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या प्रकल्पामुळे नाशिकच्या पर्यटन वाढीसाठी अधिक फायदा होईल असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक महापलिका सभागृह नेते नगरसेवक शशिकांत जाधव यांनी त्र्यंबकेश्वर येथे सुरु केलेल्या ‘फ्लॉवर पार्क’चे (Flower Park) उद्घाटन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते पत्रकार ते बोलत होते.याप्रसंगी नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

‘नाशिक फ्लॉवर पार्क’चे हे दुसरे वर्ष असून नाशिक महानगरपालिकेचे सभागृह नेते तसेच उद्योजक शशिकांत जाधव यांच्या संकल्पनेतून नाशिकच्या पर्यटनाच्या दृष्टीने ‘नाशिक फ्लॉवर पार्क’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना राबविली गेली आहे. पहिल्या वर्षी सुमारे साडेचार एकर मध्ये हा प्रकल्प सुरु करण्यात आला.मात्र यंदा जवळपास ९ एकर मध्ये हा भव्य ‘नाशिक फ्लॉवर पार्क’ उभारण्यात आला आहे. या पार्क मध्ये भारतीय प्रजातीच्या फुलांसोबत ४२ विविध प्रकारच्या विदेशी फुलांच्या प्रजाती आहे. या फुलांच्या प्रजाती अमेरिका, नेदरलँड्, जपान या देशातील आहे. या देशातून अत्यंत महागडे बियाणे आणून या फ्लॉवर पार्क मध्ये त्यांचे रोपण करण्यात आले आहे.

या भव्य अशा पार्क मध्ये जवळपास ४ लाख रोपे तयार करण्यात आलेली आहे. रोपांच्या माध्यमातून २.५ लाखांहून अधिक कुंड्या तयार करण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर जमिनीवरही काही रोपांची लागवड करण्यात आली आहे. या फ्लॉवर पार्क मुळे त्र्यंबकेश्वर, हरसूल परिसरातील जवळपास दीडशे आदिवासी बांधवाना रोजगार उपलब्ध झालाआहे. कोरोनाच्या संकटातही याठिकाणी हे लोक काम करत आहे. नाशिकच्या पर्यटन विकासासाठी ‘नाशिक फ्लावर पार्क’ महत्वाचं केंद्रबिंदू बनेल असे ना. भुजबळ त्यांनी सांगितले.

नाशिक मध्ये बोट क्लब सुरू होण्यासाठी आता कुठलीही अडचण नाही कोरोनाच्या साथी मुळे अद्याप ते सुरू होऊ शकले नसले तरी कोरोनाचे प्रादुर्भाव कमी होताच ते लवकरच सुरु करण्यात येईल. कोरोना प्रादुर्भाव वाढू नये हा एकमेव हेतू आहे.

रक्तदान शिबिराचा कार्यक्रम कौतुकास्पद

नाशिक फ्लॉवर पार्कचे (Flower Park)उद्घाटन झाल्यापासून पुढील ९० दिवस नाशिकमधील अर्पण व जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान शिबीर राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम अतिशय उपयुक्त आणि कौतुकास्पद आहे असा सामाजिक उपक्रमाचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी कौतुक केले.