सर्वात वर

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांचे निधन

नाशिक- प्रसिद्ध कापड उद्योजक महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष दिग्विजय कपाडिया यांचे आज (रविवार ४ जुलै ) पहाटे अडीच वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते ७६ वर्षांचे होते.गेल्या काही दिवसापासून त्यांच्यावर नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.

२०१० साली त्यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे (Maharashtra Chamber of Commerce) अध्यक्ष पदाची धुरा सांभाळली होती तत्पूर्वी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष असतांना त्यांनी नाशिकला कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाची शुभारंभ केला होता.

रेल्वेच्या विभागीय व झोनल समिती सदस्य म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत होते. रोटरी क्लबच्या माध्यमातून त्यांनी अनेक प्रकल्प उभे करण्यामध्ये पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या अभ्यासू व्यक्तिमत्त्वामुळे अनेक क्षेत्रात प्रशिक्षण देण्यामध्ये ते नेहमी अग्रेसर राहत होतेउत्साही, मितभाषी, जनसंपर्क वाढविण्यावर विशेष भर ठेवणारे असे हे व्यक्तिमत्त्व होते.

त्यांच्या पश्चात पत्नी ,एक मुलगा,एक मुलगी,सून,जावई तसेच बंधू कापड व्यापारी सुरेश कापडिया असा परिवार होता.