सर्वात वर

माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांचे निधन

नवी दिल्ली – भाजपा नेते व माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी (Dilip Gandhi) यांचे आज पहाटे(दि. ७ मार्च) कोरोना मुळे दिल्लीत निधन झाले.ते ७० वर्षांचे होते. श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने त्यांनी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला.त्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.  उपचार सुरु असतांनाच पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.

 दिलीप गांधी (Dilip Gandhi) हे ३ वेळा अहमदनगर मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आले होते. २००३ ते २००४ दरम्यान भाजपा सरकार मध्ये त्यांनी केंद्रीय जहाज बांधणी मंत्री म्हणून काम पहिले होते.दिलीप गांधी यांच्या निधनामुळे अहमदनगर जिल्ह्यात सामाजिक व राजकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.