सर्वात वर

Good News : Air India कडून विमान प्रवाशांसाठी तिकीट दरात 50 % Discount

नवी दिल्ली – कोरोना काळात बंद असलेल्या विमान सेवा काही महिन्यानंतर सुरु झाल्या.कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रेल्वे सेवांसह विमानसेवेवरही मोठा परिणाम झाला सुरवातीच्या काळात कमी क्षमतेने विमान सेवा सुरु होत्या.परंतु Coronavirus च्या संसर्गाच्या भीतीने नियमित विमान प्रवास करणाऱ्यांनी विमान प्रवास टाळणे पसंद केले. मात्र आता या वातावरणात विमान प्रवास अधिक सोपा आणि स्वस्त करत Air India या कंपनीकडून प्रवाशांना खास सवलत देण्यात येत आहे.

Air India कडून विमान प्रवासाच्या तिकिटात  देण्यात येणारी सूट मात्र ठराविक वर्गातील प्रवाशांसाठी पुरविण्यात येत आहे. या वर्गातील प्रवाशांकडून प्रवास तिकीट अर्ध्या किंमतीत  मिळणार असल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षांहून जास्त वय असणाऱ्या प्रवाशांसाठी कंपनीनं तिकीट दरांवर तब्बल ५० टक्के सवलत देण्यात येत आहे.या बाबत Air India च्या  संकेतस्थळावर सविस्तर माहितीसुद्धा देण्यात आली आहे. पण ही सवलत घेणाऱ्या प्रवाशांना काही नियम आणि अटींचं पालन करणं बंधनकारक असणार आहे.

प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही नियम व अटी 

  • हि सवलत भारतात कोणत्याही ठिकाणी प्रवास करण्यासाठी लागू असेल 
  • प्रवास करणाऱ्याचे वय ६० वर्षांहून अधिक असावे, लहान मुलांना या सवलतीचा फायदा मिळणार नाही. 
  • प्रवास करणाऱ्या व्यक्तीकडे ओळखपत्र असणे बंधनकारक आहे. त्या ओळखपत्रावर जन्म तारीख असणे गरजेचे आहे. 
  • प्रवास करण्याच्या तीन दिवस आगोदर हे तिकीट काढणे आवश्यक असणार आहे. 
  • Economy केबिन बुकींग श्रेणीअंतर्गत मूळ तिकीट दराच्या ५० टक्के रक्कम बंधनकारक.