सर्वात वर

Good News : ऑक्सिजन च्या वाहतुकीसाठी”ऑक्सिजन एक्स्प्रेस”धावणार

ऑक्सिजन घेण्यासाठी महाराष्ट्रातून १० टँकर जाणार

नवी दिल्ली : देशात कोरोनाचे संकट गडद झाले आहे.राज्यातील अनेक शहरात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडतो आहे.राज्यातील ऑक्सिजनची गरज भागवण्यासाठी आता ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express) धावणार आहे. ऑक्सिजनच्या तातडीच्या वाहतुकीसाठी रेल्वेची ऑक्सिजन एक्सप्रेस धावणार आहे.उद्या १९ एप्रिलला कळंबोली स्थानकावरून विशाखापट्टणमच्या दिशेने ही ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना होणार असून दहा टँकर महाराष्ट्रातून जाणार आहेत.

लिक्विड मेडिकल ऑक्सिजन आणि ऑक्सिजन सिलेंडर नेण्यासाठी रेल्वेची पूर्ण तयारी झाली आहे. ऑक्सिजन एक्सप्रेसच्या वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार केला जाणार आहे. कळंबोली रेल्वे स्टेशनहून दहा रिकामे टँकर्स वायझॅक, जमशेदपूर, रौरकेला, बोकारो येथे रवाना होणार आहेत. तेथून ऑक्सिजन भरुन पुन्हा ऑक्सिजन एक्स्प्रेस (Oxygen Express) महाराष्ट्रात दाखल होणार आहे.अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या ट्विटर हॅण्डल वरून देण्यात आली आहे.