सर्वात वर

ग्रंथ तुमच्या दारी, लेखक वाचक यांतील दुवा – कौतिकराव ठाले-पाटील

नाशिक (प्रतिनिधी) : वाचन करणे ही मूलभूत प्रेरणा असून पुस्तके वाचकांपर्यंत नेण्यासाठी ‘ग्रंथ तुमच्या दारी’(Granth Tumchya Dari) सारखी चळवळ वाचक व पुस्तक यांच्यातील नाते बळकट करते. तसेच वाचन संस्कृतीच्या विकासासाठी कृतीशील दिशा देते. असे प्रतिपादन अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी केले.

कुसुमाग्रज स्मारक येथे ग्रंथ तुमच्या दारी योजनेच्या उपक्रमाची माहिती 

श्री. ठाले-पाटील यांनी जाणून घेतली त्याप्रसंगी ते बोलत होते. या उपक्रमाचे शिल्पकार विनायक रानडे यांनी स्वागत केले व योजनेची यशस्वी घोडदौड सांगितली. यावेळी दादा गोरे, कुंडलिक अतकरे, रामचंद्र काळुंखे, प्रा. शंकर बोऱ्हाडे उपस्थित होते. अशा प्रकारचे वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे प्रयोग गावोगावी होणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.  

ग्रंथ तुमच्या दारी (Granth Tumchya Dari)मराठी वाचक जेथे, ग्रंथ तुमच्या दारी तेथे. ग्रंथ तुमच्या दारी ची विक्रमी घोडदौड सुरू आहे. 2 कोटी 25 लाख रुपयांची ग्रंथ संपदामहाराष्ट्र, गोवा, गुजराथ, दिल्ली, सिल्व्हास, तामिळनाडू, कर्नाटक तसेच भारताबाहेर दुबई, नेदरलँड, टोकियो, अटलांटा, स्वित्झरलॅन्ड, ऑस्ट्रेलिया, फिनलँड, वॉशिंग्टन डीसी, मॉरिशस, ओमान, मस्कत, सॅनफ्रान्सिस्को, बे एरिया, सिंगापूर, लंडन, श्रीलंका आदि ठिकाणी पोहोचली असून तिथे वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभत आहे